खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या यशस्वी वैद्यकीय सेवेची १३ वर्षे पूर्ण
वर्धापन दिनानिमित्त २५ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान भव्य आरोग्य सेवा महोत्सवाचे आयोजन डॉ. परेश खंडागळे
सांगोला, प्रतिनिधी :
कडलास रोड, सांगोला येथील खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, अत्याधुनिक आणि परवडणारी वैद्यकीय सेवा देत यशस्वी १३ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दि. २५ जुलै २०२६ ते सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत “भव्य आरोग्य सेवा महोत्सव” आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ.परेश खंडागळे ,डॉ. स्वाती खंडागळे यांनी दिली

या महोत्सवामध्ये सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात शस्त्रक्रिया, विविध आजारांवरील उपचार, शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ, सर्व प्रमुख हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा तसेच हॉस्पिटल बिलावर विशेष सवलती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अल्प दरात शस्त्रक्रिया
महोत्सवात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ₹६,०००, नॉर्मल डिलिव्हरी ₹५,०००, गर्भाशयाची पिशवी साफ करणे ₹६,०००, सिझेरियन ₹१५,०००, गर्भाशयाची पिशवी काढणे ₹१५,०००, सुंता ₹१०,०००, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध तसेच फिशर व फिस्ट्युला शस्त्रक्रिया प्रत्येकी ₹१५,००० मध्ये करण्यात येणार आहेत.

दुर्बिणीद्वारे (Laparoscopic) गर्भाशयाची पिशवी काढणे ₹२०,०००, कुटुंब नियोजन ₹१०,००० आणि अपेंडिक्स शस्त्रक्रिया ₹२०,००० मध्ये उपलब्ध राहतील. मेडिकल, भूलतज्ज्ञ, इम्प्लांट व लॅबचा खर्च स्वतंत्र राहील.
मेडिसिन विभागाची विशेष ऑफर
महोत्सवानिमित्त ICU मध्ये दाखल रुग्णांना तसेच इतर अॅडमिट रुग्णांना हॉस्पिटल बिलावर ५० टक्क्यांपर्यंत विशेष सवलत देण्यात येणार आहे.
सर्व प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा
हॉस्पिटलमध्ये Star Health, Niva Bupa, Care Health, ICICI Lombard, HDFC ERGO, Aditya Birla Health Insurance, Tata AIG, SBI General, Bajaj Allianz, Reliance General, Future Generali, Digit Insurance, Universal Sompo, Cholamandalam MS तसेच Medi Assist, Vidal Health, Paramount, FHPL, MDIndia, Health India यांच्यासह सर्व प्रमुख TPA आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांना फ्रॅक्चर, मुतखडा, प्रोस्टेट, जन्मजात विकार, बालरोग उपचार आदींसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात.
तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत कुटुंब नियोजन, गर्भाशय पिशवी काढणे, गर्भाशय पिशवी साफ करणे, अपेंडिक्स, हर्निया तसेच कान-नाक-घसा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गतही पात्र रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रियेचा लाभ दिला जातो.
उपलब्ध वैद्यकीय सेवा
हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग, जनरल सर्जरी, मेडिसिन, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, त्वचा व केस रोग, कान-नाक-घसा, ट्रॉमा केअर सेंटर, सोनोग्राफी, ICU, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, २४ तास आपत्कालीन सेवा, अनुभवी डॉक्टर, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित या विशेष आरोग्य सेवा महोत्सवाचा लाभ घेऊन स्वतःचे व कुटुंबियांचे आरोग्य जपावे, असे आवाहन खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. परेश खंडागळे व डॉ .स्वाती खंडागळे यांनी केले

More Stories
पत्रकारांच्या आरोग्यासाठी डिजिटल मीडिया संपादक संघटना व ट्युलिप हॉस्पिटल सरसावले – पंढरपुरात आरोग्य शिबिर संपन्न
पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी पंढरपुरात मोफत महाआरोग्य शिबिर –
दक्षता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल,सांगोला येथे एक महिना पूर्णपणे मोफत मुत्ररोग निदान – उपचार,शस्त्रक्रिया शिबिर..