कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये क्रीडा सप्ताह संपन्न.
पंढरपूर प्रतिनिधी,
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा शालेय क्रीडा सप्ताह अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाला. या क्रीडा सप्ताहाचे उदघाटन प्रशालेच्या प्राचार्या मा. प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते झाले. तर क्रीडा सप्ताहाची सांगता श्री.सुहास पवार सॉफ्टवेअर इंजिनिअर, बोश अँड सिमेन्स होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, बेंगलोर आणि सौ.रेणुका सुहास पवार यांच्या हस्ते झाली. या क्रीडा सप्ताहामध्ये विविध क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. इयत्ता नर्सरी ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी यामध्ये अतिशय उत्साहाने सहभाग घेऊन हाउसवाइज क्रमांक मिळविले. त्याचबरोबर वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये सुद्धा प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे खेळ करून मिळवले.
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व पंचांचे काम करण्यासाठी प्रशालेतील शिक्षकांनीच पुढाकार घेतलेला होता. या सर्व क्रीडा सप्ताहामध्ये क्रीडा शिक्षक व इतर सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉली बॉल इ. यासारखे सामने खेळून इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. तसेच या क्रीडा सप्ताहाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे माता पालकांचे कबड्डी, खो-खो, क्रिकेट चे सामने तर पिता पालकांचे क्रिकेट सामने ही होते. या क्रीडा सप्ताहासाठी प्रशालेच्या प्राचार्या मा. सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी प्रेरणा दिली व अत्यंत उत्साहामध्ये हा क्रीडा सप्ताह संपन्न झाला.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम