23/12/2024

लक्ष्मी टाकळी गावच्या यशात आणखी एक मानाचा तुरा..

लक्ष्मी टाकळी गावच्या यशात आणखी एक मानाचा तुरा..

पंढरपूर प्रतिनिधी- गणेश चंदनशिवे

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांच्या वतीने दिला जाणारा कृतीशील आर्दश शिक्षक पुरस्कार विद्या विकास प्रशाला व संस्थेचे अध्यक्ष श्री विलास रामचंद्र देठे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान व क्रां. लहुजी सैनिक दल यांच्या कडून सत्कार करण्यात आला . लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान चे खजिनदार मा.समाधान नवगिरे, सचिव मा.दयानंद साठे , पत्रकार मा.गणेश चंदनशिवे, संतोष साठे, व क्रां लहुजी सैनिक दल चे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वाघमारे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तरी उपस्थित ,रवि वाघमारे, अण्णासाहेब रणदिवे, दता वाघमारे, अजित वाघमारे, होते.

शेतकरी कुटुंबात असताना अतिशय बिकट परिस्थितीमध्ये गावातील सहकाऱ्यांसोबत एकत्र येऊन शिक्षणाचे वटवृक्ष 1997 मध्ये लावलं या शिक्षणाचे मोठा वड होऊन आज या प्रशालेमध्ये 400 ते 500 मुलं शिकत आहेत आणि या प्रशालेतील शिकलेली मुलं डॉक्टर, वकील, psi, पोलीस, वेगवेगळ्या सरकारी क्षेत्रात पदावरती विद्यार्थी पोहोचलेले आहेत.विलास देठे सर शाळेमध्ये इतिहास विषय शिकवतात. इतिहासातल्या गोष्टींचा जतन करत असताना माणसानं आपली नीतिमूल्य जपली पाहिजेत. आई-वडिलांची शिकवण जपली पाहिजे आणि कर्म चांगलं केलं तर चांगलं होणार आहे. कोणाचा रूपया ही बुडवायचा नाही.आणि कोणाचा ही रूपया खायचा नाही ही शिकवण कुटुंबात आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली आहे. समाजसेवा म्हणून गोरगरिबांना ते नेहमी मदत करत आलेले आहेत.आपल्या हातून कोणालाही दुःख होणार नाहीकोणावर अन्याय होणार नाही . आपण कधी चुकीचे वागणार नाहीयेयाची काळजी घेतात.

कर्मचे निश्चित फळ मिळते आणि कर्माला भिऊन आपण आपले चांगलं कर्म केलं पाहिजे. कारण” जसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर” या युक्तीप्रमाणे त्यांनी त्यांच्या जीवनभरामध्ये अतिशय चांगले काम केलेला आहे.या कलियुगामध्ये त्यांनी त्यांच्या आई-वडिलांपासून आजपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती जपली आहे आणि एकत्र कुटुंब पद्धत जपत असताना सर्वांना समता- बंधुता याची वागणूक दिलेली आहे. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करतात आणि सरांची शेती सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान वापरून करतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.