मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बिरोबा, दामाजी, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन दाखल केला उमेदवारी अर्ज
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांनी सोमवारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी आज हुन्नूर येथील श्री बिरोबा, हुलजंती येथील श्री महालिंगराया, मंगळवेढा येथे संत दामाजी पंत, पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी, संत चोखा मेळा यांचे चे दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, महात्मा जोतिबा फुले,विश्व रत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,भाई राऊळ यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून, दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.
तत्पूर्वी त्यांनी हुन्नूर येथील बिरोबा देवाचे, मंगळवेढा येथील दामाजी पंथांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या चरणावर ठेवून दर्शन घेतले. याचबरोबर त्यांनी सर्व महापुरुषांना पुष्पहार घालून अभिवादन करून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शक्ती प्रदर्शन न करता आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदार संघात भेडसावणारे अनेक प्रश्न, बेरोजगारीची समस्या सोडवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल असा विश्वास दिला.यावेळी त्यांनी विद्यमान आमदारांनी कोणतेही काम केले नसल्याने मी केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून जनता मला भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला.
चौकट-
देव देवतांचे दर्शन घेऊन महापुरुषांना अभिवादन करून दिलीप धोत्रे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी सोमवारी मंगळवेढा तालुक्यातील हून्नूर येथील बिरोबा देवाचे दामाजीपंतांचे दर्शन घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या चरणावर उमेदवारी अर्ज ठेवून दर्शन घेतले यानंतर सर्व महापुरुषांना अभिवादन करून नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शक्ती प्रदर्शन न करता साध्या पद्धतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम