23/12/2024

युवा चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश.

युवा चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश.

पंढरपूर प्रतिनिधी,


दरवर्षीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये युवा चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन दिलेली चित्रे सुंदर रीतीने काढून व रंगवून यामध्ये आपली कला दाखवत यश संपादन केले.

या सर्व विद्यार्थ्यांना युवा तर्फे चित्रकला साहित्य भेट देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी केले.