दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला तुफान प्रतिसाद ; लोणविरे, मानेगाव, निजामपूर आणि हनमंतगाव परिसरातही दिपकआबांचा गावभेट दौरा सुपरहिट
गावभेट दौऱ्यात दिपकआबांना राखी बांधून महिलांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण
सांगोला :तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय ठरत असून दररोज हजारो नागरिकांना गावभेट दौऱ्यातून न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आबांच्या गावभेट दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी लोनविरे, हणमंतगांव, मानेगणव,निजामपूर, गावातही आबांच्या गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वड्यावस्त्यवरील हजारो नागरिकांशी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिलखुलास संवाद साधला.
दरम्यान गावभेट दौऱ्यावर असलेल्या माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांना हणमंतगाव, निजामपुर, लोणविरे आणि मानेगाव परिसरातील असंख्य महिलांनी दिपकआबांना राखी बांधून आपल्या लाडक्या भाऊराया सोबत रक्षाबंधन हा सण साजरा केला.
शनिवार दि १२ रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी लोनविरे, हणमंतगांव, मानेगाव,निजामपूर, ता सांगोला येथील दलीतवस्ती, भजनावळे -गायकवाड – वस्ती,मोरे – माने वस्ती,गाडेकर,बोराडे वस्ती, मोरे – माने – भजनावळे,नवले – पाटील,करचे वस्ती येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या लहान सहान समस्या जाणून घेतल्या व जागेवरूनच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. तर अन्य सार्वजनिक समस्या लवकरच सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले.यावेळी पदाधिकारी जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारच्या सत्रात मानेगांव,निजामपूर परिसरातील बाबरवस्ती, दलीत वस्ती, केदार मळा , गावभाग, नंदिवाले , लवटे,कोळेकर, कोकरे वस्ती, नवामळा परिसरातील नागरीकांच्या व्यथा जाणून त्यातील बऱ्याच समस्यांचा तत्काळ निपटारा केला. यादरम्यान जागोजागी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे महीला ,पुरुष तसेच युवकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात असल्याचे दिसून आले.
चौकट ;
१) मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या जनसंवाद यात्रेनिमित्त सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तर मागील ३० ते ३५ वर्ष राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होता आले. ग्रामीण भागात खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी या गाव भेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सोडवू शकलो या गोष्टीचे मनापासून समाधान आहे. निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणे हेच आपले संस्कार आणि वारसा असल्याने कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जनतेची सुखदुःखे जाणून घेत आहे आणि जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे
दिपकआबा साळुंखे पाटील
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
More Stories
कर्मयोगी जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचा ९३ टक्के निकाल.
चेअरमन श्रीनिवासदादा करे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा!
इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ‘सीईटी २०२५’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू