23/12/2024

स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात हजारो कोटीचा निधी- आ समाधान आवताडे

 स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर पहिल्यांदाच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात हजारो कोटीचा निधी- आ समाधान आवताडे

मंगळवेढा शहरात 9 कोटी 55 लाख रुपये च्या कामाचे उद्घाटन

मंगळवेढा प्रतिनिधी,

देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली या कालावधीमध्ये हजारो कोटीचा निधी पहिल्यांदाच या मतदारसंघाला मिळाला असून मला पोटनिवडणुकीत मिळालेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातील एक वर्ष हे विरोधी बाकावर बसून गेले होते उर्वरित दीड वर्ष सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये कोट्यावधीचा निधी खेचून आणला आहे. केवळ मंगळवेढा शहराच्या विकासासाठी 142 कोटी 83 लाख 50 हजार रुपये निधी मंजूर केला असून अजूनही तुम्ही मागायला कमी पडू नका मी द्यायला कमी पडणार नाही असे अवाहन आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केलेयावेळी व्यासपीठावर मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी बी आर माळी माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर भाजपचे तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष येताळा भगत, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष अशोक चौंडे, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र सुरवसे सुरेश ढोणे प्रताप सावजी, आनंद मोरे, सुरेश मेटकरी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे,एड भारत पवार, संजय कट्टे, शिक्षक नेते संजय चेळेकर, प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे आकाश डांगे युवराज शिंदे यांचे सह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ समाधान आवताडे म्हणाले की मी कोणाच्याही टिकेला उत्तर देत बसण्यापेक्षा माझ्या कामातून त्यांना उत्तर देतो काही मंडळी निवडणुकीच्या तोंडावर जातीचे राजकारण करू पाहत आहेत मात्र जातीचे राजकारण करणाऱ्यांनी आपली गाठ समाधान आवताडे यांच्याशी आहे याचे भान ठेवून वागावे निवडणुकीच्या तोंडावर राजकारणासाठी अनेक जण वेगवेगळ्या वावड्या उठवत असतात त्याकडे कुणीही लक्ष न देता आपल्या कामाच्या जोरावर आपण लोकांमध्ये जात तयारीला लागा असे आवाहनही त्यांनी केले . आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंगळवेढा शहरातील ९ कोटी ५५ लाख रुपये रकमेच्या कामांचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये बोराळे नाका येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित पुतळ्याशेजारी सुशोभीकरण करणे १७ लाख,साठे नगर येथील शाळा विकसित करणे व नवीन इमारत खोल्या बांधणे २.५ कोटी , कल्याण प्रभू मंदिर ते नागणेवाडी दादा डोंगरे घरापर्यंत रस्ता व भिवाजी साळुंखे घरापासून तुकाराम सावजी घरासमोर गटार बांधणे २४ लाख , मंगळवेढा शहरातील मुरडे गल्ली येथील पंडित ऑफिस ते महालक्ष्मी मंदिर पप्पू सावंजी घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे २३ लाख रुपये, मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार शेडच्या आजूबाजूचा परिसर कॉंक्रिटीकरण करणे ३९ लाख ८९ हजार, ऐतिहासिक महादेव विहीर पुनरनिर्माण व सुशोभीकरण करणे १ कोटी ८० लाख, नगरपालिका शाळा नंबर एक येथे इमारत खोल्या बांधणे १ कोटी २५ लाख, नगरपालिका शाळा नंबर एक येथे इमारत खोल्या मंगळवेढा शहरातील बांधणे १ कोटी ६४ लाख इतक्या कामाचे उद्घाटन करण्यात आले असून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित ठेकेदारांना दिले आहेत.

यावेळी माजी नगराध्यक्ष भारत नागणे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रतीक किल्लेदार सचिन शिंदे विजय माने बाबा कोंडुभैरी, संजय माळी, दीपक सुडके,दत्ता साबणे, खंडू खंदारे जगन्नाथ रेवे, शिवाजी सरगर, कैलास कोळी,चंद्रकांत गरंडे, मधुकर मुरडे अनिल मुरडे विवेक पंडित,अमोल गवळी अशोक माळी ज्ञानेश्वर पगारे रमेश जोशी अरुण किल्लेदार महेश भीमदे विठ्ठल सरगर सिद्धेश्वर कोकरे भारत गरंडे प्रभाकर खांडेकर संतोष पवार शिवाजी पटाप अर्जुन मल्हाळे सुरेश मेटकरी चंद्रकांत पडवळे,धनंजय पाटील, दिलीप जाधव रामचंद्र दत्तू उपस्थित होते.

चौकट- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार समाधान आवताडे यांच्या हाती आल्यापासून त्यांनी फक्त मंगळवेढा शहरासाठी 142 कोटी 83 लाख 50 हजार रुपयाचा निधी मंजूर करून आणला असून त्यांनी पूर्ण मतदारसंघांमध्ये हजारो कोटींचा निधी आणला आहे असा निधी आणणारा आतापर्यंतच्या काळातील पहिलाच आमदार असून यापुढेही जनता त्यांनाच संधी देणार आहे.

समाधान हेंबाडे तालुकाध्यक्ष प्रहार संघटना