23/12/2024

चोपडी आणि नाझरा परिसरात दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला तुफान प्रतिसाद

चोपडी आणि नाझरा परिसरात दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला तुफान प्रतिसाद

खेडोपाडी वाड्यावस्त्यावर जाऊन हजारो नागरिकांशी दिपकआबांचा दिलखुलास संवाद

सांगोला : तालुका प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय ठरत असून दररोज हजारो नागरिकांना गावभेट दौऱ्यातून न्याय मिळत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आबांच्या गावभेट दौऱ्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. सोमवार दि १२ रोजी चोपडी आणि नाझरा गावातही आबांच्या गावभेट दौऱ्याला सामान्य नागरिकांचा तुफान मिळाला.

खेड्यापाड्यातील हजारो नागरिकांशी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिलखुलास संवाद साधला. सोमवार दि १२ रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी चोपडी ता सांगोला येथील गाव भाग बुद्ध विहार ईश्वरमळा, रानमळा, बंडगरवाडी, कारीमळा, कोष्टीमळा व पट्टीमळा येथील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व जागेवरूनच संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोपडी परिसरातील पदाधिकारी जेष्ठ कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच दुपारनंतर नाझरा ता सांगोला येथील चिंचमळा, सोनारकी, नवामळा, काझीवस्ती, गावभाग, भिमनगर, सरगरवाडी कुंभारगल्ली, देशपांडेगल्ली येथील नागरिकांना भेटून नाझरा परिसरातील समस्या जाणून घेतल्या. या परिसरातील महिलांनी आरोग्य आणि अन्य समस्यांचा पाढा वाचून दाखवला यावेळी तात्काळ दिपकआबांनी संबंधित विभागाला धारेवर धरून येथील महिलांच्या समस्या सोडविल्या. दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या नाझरा परिसरातील नागरिकांशी दिलखुलास संवाद साधत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. चोपडी आणि नाझरा या दोन्ही गावात मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांचे येथील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

१) गेली ३० ते ३५ वर्ष राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होता आले. ग्रामीण भागात खेडोपाडी राहणाऱ्या नागरिकांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अडचणी या गाव भेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने सोडवू शकलो या गोष्टीचे मनापासून समाधान आहे. निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणे हेच आपले संस्कार आणि वारसा असल्याने कोणताही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जनतेची सुखदुःखे जाणून घेत आहे आणि जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.

चौकट ;

दिपकआबा साळुंखे पाटील

जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट