माण नदीवर गुंजेगाव-तनाळी उपसा सिंचन योजनेकरिता बॅरेजेस बांधावा मा.आ.प्रशांत परिचारक यांची उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
पंढरपूर – मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये माण नदीवरती गुंजेगाव-तनाळी येथे एक बॅरेज (बंधारा) बांधून यामध्ये उजनीचे पाणी सोडून तेथून उपसा करण्याचे नियोजन होते. परंतु खर्च वाढत असल्यामुळे बॅरेज (बंधारा) ऐवजी विहीर घेवून त्यामध्ये उजनीचे पाणी सोडून उपसा करण्याचे नियोजन केले असून त्याचे टेंडर निघालेले आहे.परंतू माण नदीवरती मोठे बॅरेजेस (बंधारा) बांधल्यास पावसाळ्यातले वाहून जाणारे अतिरिक्त 20 टीएमसी पाणी अडवून मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळ कमी करण्यास मदत होणार असल्याचा दावा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला असून याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.त्याअनुषंगाने मा.आ.प्रशांत परिचारक यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी त्यांनी मंगळवेढा पंढरपूर तालुका कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. माण नदीवर गुंजेगाव-तनाळी येथे विहीर पण बांधून त्याचबरोबर बॅरेजेस (बंधारा) बांधल्यास याचा मोठा फायदा मंगळवेढा तालुक्याला होणार असल्याचे स्पष्ट केले.वास्तविक माण नदीला पावसाळ्यामध्ये एक किंवा दोन वेळा पूर येतो. हे 15 ते 20 टीएमसी पाणी भिमा नदीवाटे कर्नाटक राज्यात वाहून जाते. तसेच म्हैसाळ व टेंभु या योजनेमधून पावसाळ्यातले अतिरिक्त पाणी माण नदीमध्ये गेली अनेक वर्ष पासून सोडले जाते. या पाण्याला आडवून त्याचा वापर मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन साठी देण्यात यावा. यामुळे उजनी धरणावरील अतिरिक्त पाण्याचा भार कमी होईल त्यामुळे याचा आणखी एक फायदा होणार असून उजनीतून एखादी ज्यादाची पाण्याची पाळी आपल्याला घेता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पाणी मिळेल. बंधारा रद्द केल्यामुळे ते वाहून जाणारे पाणी आपण आडवू शकत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे परिचारक यांनी फडणवीस यांना सविस्तरपणे सांगितले.त्यामुळे माण नदीवरती गुंजेगाव-तनाळी या ठिकाणी बॅरेजेस (बंधारा) बांधून विहीर पण बांधल्यास, मंगळवेढा व पंढरपूर येथील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे.माण नदीवरती एक मोठा बॅरेजेस बंधारा बांधल्यास त्या नदीमधून वाहून जाणारे पाणी वापरता येईल अशी मागणी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली व त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर काम पुर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम