लोकशाहीर अण्णाभाऊंच्या लेखणीने मराठी साहित्याचे दालन समृद्ध आणि देखणे केले-संचालक विरेन भिरडी
स्वेरीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
पंढरपूर- ‘मराठी साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊंच्या लेखन प्रतिभेने ग्रामीण भागातील साहित्याचे दालन अधिक समृद्ध आणि देखणे केले कारण लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्यात आणि शाहिरीमधून कधीही नकारात्मकता दिसत नाही. बालपणी प्रतिकूल परिस्थितीमुळे आयुष्यातील केवळ एकच दिवस शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.’ असे प्रतिपादन कोल्हापूर मधील महर्षी स्वामी विवेकानंद इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक विरेन भिरडी यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कोल्हापूर मधील महर्षी स्वामी विवेकानंद इंजिनिअरिंग कॉलेजचे संचालक विरेन भिरडी हे मार्गदर्शन करत होते. सुरवातीला संचालक विरेन भिरडी यांच्या हस्ते साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, शाहिरी, पोवाडे, लावणी व ग्रामीण साहित्य यावर सविस्तर माहिती दिली. यावेळी कोल्हापूर मधील महर्षी स्वामी विवेकानंद इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. शिरीष कुलकर्णी, एस.डी.पवार, संभाजी पवार यांच्यासह संस्थेचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, संस्था अंतर्गत असणाऱ्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, प्रवेश प्रक्रियेतील डॉ. एच.एच.पवार, रासेयोचे प्रा. बी.टी. गडदे, प्रा. चव्हाण, प्रा. दिग्विजय रोंगे, प्रा. कदम, प्रा. पी.डी.बाबर, प्रा. अमित शिंदे, स्वेरीचे सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी आदी उपस्थित होते.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम