श्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिरढोण येथे वृक्षारोपण.
पंढरपूर प्रतिनिधी,
पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरढोन येथील महादेव मंदिर व स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आले.
शिरढोण गावचे माजी सरपंच आण्णासाहेब भुसनर यांनी सांगितले की चेअरमन अभिजीत पाटील हे निसर्गप्रेमी असून त्यांना वृक्षांची आवड आहे म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिरढोन येथील कार्यकर्त्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शिरढोन गावच्या विद्यमान सरपंच मुक्ताबाई लोखंडे माजी सरपंच अण्णासाहेब भुसनर देविदास भुसनर जगन्नाथ भुसणार सूर्यकांत भुसनर या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बब्रूवान भुसनर जालिंदर भुसणार सोमनाथ भुसणार अंकुश पवार सिताराम बंडगर विक्रम व्हरगर दत्ता भुसनर यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
More Stories
कर्मयोगी जीएनएम नर्सिंग महाविद्यालयाचा ९३ टक्के निकाल.
चेअरमन श्रीनिवासदादा करे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा!
इंजिनिअरिंग प्रवेशासाठीच्या ‘सीईटी २०२५’ करिता ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू