23/12/2024

वाढदिवसानिमित्त निरू भैय्या युथ फाऊंडेशन यांच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम संपन्न

वाढदिवसानिमित्त निरू भैय्या युथ फाऊंडेशन यांच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रम संपन्न…

निरू भैय्या युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयु निरंजन बळीराम गडहिरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रगती विद्यालय वाणिचिंचाळे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले प्रगती विद्यालयास प्रथमउपचार किट देण्यात आले, व सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सांगण्यात आले की कोणत्याही विद्यार्थ्यास शैक्षणिक अडचण असल्यास संपर्क करावा यावेळी विद्यालयाच्या वतीने स्वामी सर यांनी शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला

त्याचबरोबर सांगोला येथे यशोजीवन हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर आयोजित करून सध्या कमी असलेला रक्तपुरवठा लक्षात घेता रक्तदान करून एक समाज उपयोगी पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला नेहमी समाज उपयोगी कामासाठी निरू भैय्या युथ फाऊंडेशन पुढाकार घेऊन त्या सर्व समस्या सोडवण्यात अग्रेसर राहील असे आश्वासन देण्यात आले, यावेळी विविध कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर पियुष दादा साळुंखे पाटील व युवा नेते यश राजे साळुंखे पाटील यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले यावेळी शुभम कसबे, भारद्वाज गडहिरे, शुभम शिंदे, साई कसबे, रनजीत रुपनर, सुशांत गडदे, निखिल चव्हाण, बिरा करडे, तुकाराम घेरडे,करण कांबळे उपस्थित होते.