23/12/2024

पंढरीत महाआरोग्य शिबिर !उत्स्फूर्त प्रतिसाद

आषाढी एकादशी सोहळ्याकरता लाखोंच्या संख्येने पंढरी नगरीमध्ये भाविक भक्त दाखल झाले असल्यामुळे विठुरायाच्या गजराने अवघी पंढरीनगरी नगरी दुमदुमून निघाली आहे.एकादशीच्या शासकीय महापजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी सायंकाळी चार वाजता पंढरीमध्ये दाखल होणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे.यामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक मराठा भवन,नवीन तुळशी वृंदावनासह नवीन चंद्रभागा बस स्थानकाचेही लोकार्पण होणार आहे या इमारतीमुळे पंढरपूर शहराच्या वैभवात अधिकच भर पडणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.

आषाढी एकादशी सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहनी करून गेल्यानंतर शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर मध्ये येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकऱ्यांप्रती मोठी श्रद्धा असल्याचे पहावयास मिळत आहे, कारण त्यांच्याकडून वारकरी, भाविकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. विशेषता मुख्यमंत्र्यांनी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केले असल्यामुळे वारकरी भाविक सुखावला आहे. एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी आदल्या दिवशी मुख्यमंत्री पंढरीमध्ये येणार असून मंगळवारी सायंकाळी चार वाजता कृषी पंढरी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन सायंकाळी 4 वाजता,तसेच पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा समारोप सायंकाळी 4:30 वाजता होणार असून सायंकाळी 5 वाजता विविध शिष्टमंडळे व लोकप्रतिनिधी यांच्या भेटीसाठी राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. बुधवार दिनांक 17 जुलै रोजी पहाटे दोन 2.30 ते 4:30 दरम्यान शासकीय महापूजा संपन्न होणार आहे त्यानंतर 9 वाजता जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. बुधवारी सकाळी 10 वाजता नवीन चंद्रभागा बस स्थानकाचे लोकार्पण व 10.30 वाजता इंद्रप्रस्थ येथे तुळशी वृंदावनचे लोकार्पण होणार असून 10.45 वाजता राजश्री छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक मराठा भावनाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे,तसेच 11 वाजता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे भूमिपूजन ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.दिनांक 16 व 17 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंढरपूर शहरांमध्ये भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे जागोजागी पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे.