23/12/2024

धनगर व एन टी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज देणार – मुख्यमंत्री

धनगर व एन टी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज देणार – मुख्यमंत्री

शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे अश्वासन ; एकादशीला विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्यासह प्रदक्षणा घालण्याचे आंदोलन स्थगित

पंढरपूर-आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर धनगर व एन टी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज तात्काळ मिळावे .पंढरपूर शहरात अहिल्या भवन उभारण्यास शासने जागा उपलब्ध करून डिपीटीसीतुन 5 कोटी निधी मिळावा .पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेची भूमी हिन दाखल्याची अट रद्द करण्यात यावी व हि योजना तात्काळ सुरू करावी.यासह इतर प्रमुख मागण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील धनगर समाज आक्रमक झाला होता. आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु परवा जिल्हाधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढत दोन मागण्या मान्य केल्या होत्या. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य करीत राज्यातील धनगर व एन टी प्रवर्गातील तरुणांना बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली.व आगामी होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीत याला मंजुरी घेऊन तात्काळ यावर सरकार आदेश काढेल असे अश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.त्यामुळे धनगर समाजाने शेळ्या मेंढ्या सहित विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणार असल्याचे आंदोलन स्थगित केले असल्याची माहिती माऊली हळणवर यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठलाच्या महापुजेला येण्यापुर्वी आमच्या मागण्याची पुर्तता करूनच यावे अन्यथा आषाढी एकादशी दिवशी पहाटे दोन वाजता शेळ्या मेंढ्या सहित विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणार असा इशारा सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने सरकारला निवेदनाद्वारे दिला होता.आता सर्व मागण्या मान्य केल्याने यापुढे आंदोलन न करता सकल धनगर समाज मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करणार आहे. यावेळी ,जिल्हाधिकारी आशिर्वाद, माऊली हळणवर,प्रसाद कोळेकर,विश्रांती भुसनर,अमोल बापु कारंडे,,संजय लवटे ,प्रशांत घोडके अदित्य फत्तेपुरकर,पंकज देवकते,आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

अहिल्या भवन उभारण्यासाठी तात्काळ कारवाई करा

पंढरपूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा व निधी तर शहरात असणाऱ्या पुतळ्याच्या सुशोभिकरण कामाला निधी उपलब्ध करून तात्काळ कामाला सुरुवात करा अश्या सुचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

फोटो – धनगर समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतांना मुख्यमंत्री शिंदे, ,माऊली हळणवर विश्रांती बसणार आदित्य फत्तेपुरकर पंकज देवकते आदी