घरगुती गॅस सिलेंडर मधून रिक्षात गॅस भरताना दोघांवर कारवाई.
5 गॅस सिलेंडर, मोटार जप्त; प्रांत, तहसील, पोलीस यांच्या संयुक्त पथकाची कारवाई
पंढरपूर :
घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैध रित्या गॅस रिक्षामध्ये भरत असताना प्रांत, तहसील, पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दोन ठिकाणी धाड टाकून केलेल्या कारवाईत 5 घरगुती गॅस सिलेंडर, गॅस भरण्यासाठी लागणाऱ्या दोन मोटारी असा 29 हजार 500 रुपयांचा मुद्दमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोटू ऊर्फ निलेश कृष्णा राजुरकर वय-32 वर्षे , नागेश जाधव वय 45 वर्ष या दोघा विरूदध जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 च्या कलम 3 व कलम 7 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी जिवितहानी होण्याची शक्यता असून,. ही बाब लक्षात घेवुन गुरुवार 11 जुलै रोजी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लगुंटे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा भरणा होत असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक, पिसाळ, आवटे, भाऊसाहेब शिंदे व कोतवाल प्रल्हाद खरे यांचे संयुक्त पथकाने कारवाई केली. पंढरपूर येथील गाडगे महाराज चौक, भक्ती मार्ग लगत असलेल्या गाळ्यात अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधुन रिक्षामध्ये भरत असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पथक गेले असता गोटू ऊर्फ निलेश कृष्णा राजुरकर वय 32 वर्षे रा. टाकळी रोड, पंढरपूर या इसमास घरगुती वापरातील एकुण 03 सिलेंडर व टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार (अंदाजे रक्कम 14हजार 900 रू) या मुदेमालासह रंगेहात पकण्यात आले. तसेच अनिल नगर झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ एका घरामध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून गॅस रिक्षामध्ये भरत असुन तेथे अवैधरीत्या गॅस विक्री करत असल्याची माहीती मिळाल्याने तातडीने पथक सदर ठिकाणी पोहोचले असता, एक बंद खोलीत 2 घरगुती गॅस सिलेंडर, इलेक्ट्रीकल वजन काटा तसेच टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार असे एकुण 14 हजार 600 रू.चे साहित्य मिळुण आले. या ठिकाणी नागेश जाधव राहत असून मुद्देमाल हा त्यांचाच असलेले समजले. दोन्ही ठिकाणचे सविस्तर वेगवेगळे पंचनामे तयार केले आहेत.त्यानुसार गोटू ऊर्फ निलेश कृष्णा राजुरकर वय-32 वर्षे व नागेश जाधव वय 45 या दोघा विरूदध जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 च्या कलम 3 व कलम 7 अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.तसेच मंदिर परिसरात हॉटेल विक्रेते यांना घरगुती गॅसचा वापर न करता व्यवसायीक गॅस सिलेंडरचा वापर करण्याचे प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम
लक्ष्मी टाकळी गावच्या यशात आणखी एक मानाचा तुरा..
१३० कोटींच्या दर्शन मंडपास शिखर समितीची मंजुरी : आ. समाधान आवताडे यांची माहिती