स्वेरीतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. त्यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीमध्ये चार वर्षे परिश्रम केल्यामुळे आणि गुरु-शिष्याचे एक वेगळे बंधन जपल्यामुळे कॉलेज सोडताना विद्यार्थी भावनिक झाले होते.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली हा समारंभ संपन्न झाला. दीप प्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी यांनी विद्यार्थ्यांना करिअरसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. एस.एम.खोमणे व शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. एम.पी.ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील जबाबदारीची जाणीव करून यशाचे कानमंत्र देताना भारताचे जबाबदार नागरिक होत असताना जनसेवा करावी.’ असे सांगितले. तसेच यावेळी प्रा.डी.डी.डफळे, प्रा. व्ही. जे. पाटील, प्रा. एस.एस.कवडे, प्रा.एम.के.पवार, प्रा. व्ही. ए. सावंत, प्रा. एस. बी. खडके यांनी देखील मार्गदर्शन केले. स्वेरीमध्ये चार वर्ष शिक्षण घेतल्यानंतर समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि चार वर्षातील आपले अनुभव सादर केले. यामध्ये श्रेया शिंदोल, सार्थक लोखंडे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांनी चार वर्षांच्या काळात संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक वर्गांनी आमच्याकडून अभ्यास कसा करवून घेतला? परिश्रमाद्वारे अभ्यासात सातत्य ठेवण्याबाबत तसेच प्राध्यापकांनी आम्हाला चुकीच्या वेळी दिलेली शिक्षा, त्यातून मिळालेले अनमोल शिक्षण यातून आमच्या करिअरसाठी तयार झालेली परिपक्वता आणि संस्कारित प्रतिमा या विषयी विद्यार्थ्यांनी अतिशय हृदयस्पर्शी असे अनुभव सांगितले. यावेळी आठवण म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वेरीतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा.आर. एन. खांडेभरड यांनी सूत्रसंचालन केले तर समन्वयक प्रा.डी.डी.डफळे यांनी आभार मानले.
More Stories
कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये क्रीडा सप्ताह संपन्न.
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत राबविला ‘नो फायर क्रेकर्स..सेफ नेचर ‘ उपक्रम.
युवा चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश.