23/12/2024

मनसेच्या मागणीला यश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रा अनुदान दहा कोटी रुपये केले मंजूर

मनसेच्या मागणीला यश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रा अनुदान दहा कोटी रुपये केले मंजूर.

पावसामुळे नुकसान झालेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक यांना त्वरित मदत करण्याचे आदेश. पंढरपूरच्या आणि मंगळवेढा तालुक्यातील विविध प्रश्नावर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची सह्याद्री या शासकीय विश्रामगृहावर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, मनसे नेते जयप्रकाश बाविस्कर यांनी भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यावर चर्चा करून निवेदन दिले. येणाऱ्या आषाढी एकादशीला पंढरपूर शहराला जास्तीत जास्त मदत करावी.

आषाढी यात्रेस येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आणि आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या प्रत्येक दिंडीला शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरवर्षी आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र शासन 5 कोटी रुपये देत होते, परंतु हे यात्रा अनुदान अतिशय कमी पडत असल्याने यावर्षी दहा कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पंढरपूर प्रचंड पाऊस पडल्याने हजारो शेतकऱ्यांचे त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे यामुळे शहरातील नागरिकांना अशी मागणी मनसेच्या वतीने यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आषाढी यात्रेसाठी यात्रा अनुदान म्हणून दहा कोटी रुपये देण्याचे संबंधितांना आदेश दिले आणि यात्रेला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला मदत करण्याचेही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पंढरपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना मंजूर होऊन चार वर्षे झाले अद्याप पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाली नाहीत, प्रधानमंत्री आवास योजनेचे काम बंद पडलेले आहे.तरी ताबडतोब प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चालू करून लाभार्थ्यांना घरे द्यावीत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यावेळी त्वरित प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे देण्याचे आदेश संबंधिताना देण्यात आले. शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले.