पदपथावर वाढलेली झाडे झुडपे नगरपालिका काढणार का ? -सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार
पंढरपूर शहरात रस्त्याचे कामे होऊन रस्ते चांगले झाले ही पंढरपूरकरांसाठी चांगली गोष्ट आहे. रस्त्याच्या दुतर्फा पदपथही निर्माण केले गेले. परंतु सध्या या पदपथावर अनेक ठिकाणी झाडे झुडपे वाढलेली आहेत.पदचारी लोकांना याचा त्रास होत आहे.तसेच बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन वरती जाळ्या बसवलेल्या नाहीत. यामुळे प्लास्टिकच्या अनेक वस्तू जाऊन ड्रेनेज तुंबण्याची ही शक्यता आहे. चालू वर्षी पाऊस ही जास्त असल्याने पंढरपूर नगरवासीयांना याचा प्रचंड त्रास होऊ शकतो. नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देऊन पदपथावरील झाडे झुडपे काढणार का? ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन वरती जाळ्या नाहीत तिथे जाळ्या बसवणार का? की एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार?


More Stories
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने
पंढरपूर अर्बन बँक सहकार क्षेत्रातील ग्रीन वर्ल्ड पुरस्काराने सन्मानित
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे