पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा आणखी एक डंका
पंढरपूर सिंहगडचा अनिशची ‘दार अल हंदसाह’मध्ये निवड
इलेक्ट्रिकल इंजिनिअरला ६.७० लाखांचे पॅकेज
पंढरपूर : प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागातील २०२६ बॅचचा विद्यार्थी, साऊथ कसबा, सोलापूर रहिवासी, अनिश रविंद्र घनाते याची पुणे येथील नामांकित दार अल हंदसाह कन्सल्टंट्स (शेअर अँड पार्टनर्स) इंडिया प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी सल्लागार कंपनीमध्ये “अभियंता – विद्युत व इमारत पायाभूत सुविधा” या पदावर निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रीकल विभाग प्रमुख डॉ. शिवशंकेर यांनी दिली.

अनिशला कंपनीकडून वार्षिक ६.७० लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ही निवड विशेष महत्त्वाची मानली जात असून, विद्युत अभिकल्पना या क्षेत्रात काम करण्याची संधी अनिशला मिळणार आहे. महाविद्यालयातील उद्योगाभिमुख प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकास, प्रकल्पाधारित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्लेसमेंट मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत असल्याचे या निवडीमधून दिसून येते.‘दार अल हंदसाह ही १९५६ मध्ये लेबनॉनमध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय बहुविषयक अभियांत्रिकी सल्लागार संस्था आहे. कंपनीकडून प्लॅनिंग, इंजिनिअरिंग, पर्यावरण, प्रकल्प व बांधकाम व्यवस्थापन, शाश्वत विकास, डिजिटल सोल्युशन्स तसेच विविध पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये सल्लागार सेवा दिल्या जातात. कंपनीची प्रमुख डिझाइन कार्यालये बेरूत, कैरो, लंडन आणि पुणे येथे असून जगभरात तिचे विविध कार्यालयीन नेटवर्क आहे. उपलब्ध कंपनी माहितीनुसार, संस्थेने अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी प्रकल्पांवर काम केले आहे.

पुण्यातील कंपनीचे कार्यालय मगरपट्टा सिटी, हडपसर येथे आहे.प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांचे मतमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी अनिश घनातेचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यापुरते मर्यादित न राहता उद्योगक्षेत्राला आवश्यक असलेली तांत्रिक कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स आणि व्यावहारिक ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. नामांकित आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेमध्ये अनिशची झालेली निवड ही त्याच्या गुणवत्तेची तसेच महाविद्यालयातील कौशल्याधारित शिक्षणपद्धतीची पावती आहे.”डॉ. समीर कटेकर यांची प्रतिक्रियामहाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर म्हणाले की, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नवीन सॉफ्टवेअर टूल्स, तांत्रिक मुलाखत आणि उद्योगाभिमुख कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावर महाविद्यालयाचा विशेष भर आहे.

अनिशची ६.७० लाख रुपयांच्या पॅकेजवर झालेली निवड ही विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचे फलित आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये उत्तम करिअरच्या संधी मिळवून देण्यासाठी प्लेसमेंट विभाग सातत्याने प्रयत्नशील राहील.”अनिश घनातेच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षकवृंद, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

More Stories
चंद्रभागेला पूर; आमदार समाधान आवताडे यांनी घेतला पूरजन्य परिस्थितीचा आढावा
बंदोबस्ताला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, स्वत:च्या रिवाल्वरमधून गोळी झाडली
संतानी पर्यावरण पूरक जीवनाचा संदेश दिला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस