22/10/2025

सांगोला येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने मोठया उत्साहात श्री दुर्गामाता महादौड संपन्न

सांगोला येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने मोठया उत्साहात श्री दुर्गामाता महादौड संपन्न.

सांगोला प्रतिनिधी,

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मार्फत संपूर्ण महाराष्ट्र श्री दुर्गामाता महादौडचे आयोजन अतिशय उत्साहात केले जाते.“दुर्गामाता दौड” -म्हणजे शिवरायाच्या अपार पराक्रमाची गाथा आणि झोपलेल्या हिंदूला खडबडून जागे करण्याची धमक.

नवरात्र उत्सवात घटस्थापना ते विजयादशमी असे प्रत्येक दिवस भल्या पहाटे उठून ,हातात भगवा झेंडा घेऊन आई जगदंबेचा,देवदेवतांचा ,छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांचा उद्घोष करत गावागावातील प्रमुख ठिकाणी समुहाने दौडत,गीती-पद्ये म्हणत दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले होते.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सांगोला विभाग यांच्या मार्फत घटस्थापना २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीमध्ये सांगोल्यातील विविध भागातून दुर्गा माता दौडचे आयोजन करण्यात आले होते.पृथ्वीतलावर जेंव्हा जेंव्हा संकट येते, जेंव्हा जेंव्हा म्लेंच्छाची गर्दी होते तेंव्हा तेंव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते. याच दुर्गेच्या नावाने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत सुरु केलेली हि दौड म्हणजे हिंदूधर्म रक्षितेच प्रतिक,

शिवरायाच्या अपार पराक्रमाची गाथा, आणि झोपलेल्या हिंदूला खडबडून जागे करण्याची धमक या दुर्गा माता दौडमध्ये दिसते.शिवरायांसारखं रत्न या भारतभूमीला लाभण, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येण हि साधी सोपी गोष्ठ नाही.

हा एक ज्वलंत इतिहास पराक्रमाचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा, या सह्याद्रीचा आणि सह्याद्रीत छातीची ढाल करणाऱ्या मावळ्यांचा संघर्ष यातुन प्रेरणा घेऊन या दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते.

सांगोला शहरात मोठ्या उत्साहात दुर्गामाता महादौड विजयादशमी दसरा दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक (शिवतीर्थ) येथून सांगोला शहरातील शिवतीर्थ – नगर पालिका – श्री तुळजाभवानी मंदिर गोंधळी गल्ली – लोहार गल्ली – डाक बंगला – श्री अंबिका देवी मंदिर – कचेरी रोड – श्री हनुमान मंदिर – मनेरी गल्ली – परीट गल्ली – शनि गल्ली – महादेव गल्ली – देशपांडे गल्ली – कोष्टी गल्ली – मेन रोड – शिवतीर्थ या मिरवणूक मार्गाने काढली. सांगोला शहरातील मोठया प्रमाणात माता- बंधू- भगिनींनी शिवकालीन पेहरावात, मावळे या वेशात दुर्गामाता महादौडीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed