22/10/2025

एस.के. एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे डीजीपीएस या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

एस.के. एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे डीजीपीएस या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा

पंढरपूर(प्रतिनिधी):

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात “डिफरेंशियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (डीजीपीएस)” या विषयावर एकदिवसीय प्रत्यक्ष अनुभवाधारित कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.ही कार्यशाळा दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाली.

कार्यक्रमात सद्गुरु कन्स्ट्रक्शन्स, पंढरपूर येथील तज्ज्ञ अभियंता श्री जीतु बत्रा यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी डीजीपीएस या जीपीएस तंत्रज्ञानाच्या प्रगत प्रणालीविषयी सविस्तर माहिती दिली. डीजीपीएस प्रणाली सर्वेक्षण, बांधकाम व पायाभूत सुविधा विकास यांसारख्या क्षेत्रांसाठी कशी उपयुक्त ठरते, हे त्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगितले.या कार्यशाळेत स्थापत्य अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपकरणांचा वापर करून डीजीपीएस प्रणाली कशी कार्य करते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामुळे त्यांच्या सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळाली.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना भू-अभ्यास, अचूक मोजमाप तंत्रज्ञान, नकाशे तयार करणे आणि बांधकाम क्षेत्रातील आधुनिक साधनांचा वापर याबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळाला.या यशस्वी कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे डिन डॉ. चेतन पिसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

You may have missed