स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे उद्या उद्घाटन समारंभ व पायाभरणी सोहळा
पंढरपूर प्रतिनिधी,
स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे उद्या उद्घाटन समारंभ व पायाभरणी सोहळा तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन चंद्रकांत (दादा) पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा) अध्यक्ष जयकुमार (भाऊ) गोरे (ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा) यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मागील २७ वर्षांपासून अविरतपणे श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर अर्थात 'स्वेरी' या संस्थेच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाचे ज्ञानामृत अनेक पिढ्यांना देत आलो आहोत. या माध्यमातून तंत्रशिक्षणाची 'ज्ञानगंगा' ग्रामीण भागात प्रवाहित करण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत. स्वेरी, पंढरपूरच्या यशस्वी आणि गौरवशाली रौप्यमहोत्सवी वाटचालीसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या श्रेणीत असणाऱ्या विधी महाविद्यालयाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करीत आहोत.
स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर, नवीन बहुउद्देशीय इमारत व विद्युत प्रकाशझोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण यांचे उद्घाटन आणि मुलींचे ९ मजली नूतन वसतीगृह क्र. ४ चा पायाभरणी सोहळा रविवार, दि. ३१/०८/२०२५ रोजी, सकाळी ठिक ८.३० वाजता आयोजित केला आहे.
हा कार्यक्रम चंद्रकांत (दादा) पाटील (उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा) अध्यक्ष, जयकुमार (भाऊ) गोरे (ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी समाधान (दादा) आवताडे (विधानसभा सदस्य, पंढरपूर-मंगळवेढा), राजू (भाऊ) खरे (विधानसभा सदस्य, मोहोळ), अॅड. शहाजी (बापू) पाटील (माजी विधानसभा सदस्य, सांगोला), राम (भाऊ) सातपुते (माजी विधानसभा सदस्य, माळशिरस), अभिजीत (आबा) पाटील (विधानसभा सदस्य, माढा), बाबासाहेब देशमुख (विधानसभा सदस्य, सांगोला), प्रशांत (मालक) परिचारक (माजी विधानपरिषद सदस्य), शशिकांत चव्हाण (जिल्हाध्यक्ष, भाजपा) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी कार्यक्रम स्थळी आपली बहुमूल्य उपस्थिती दर्शवून आमचा आनंद वृद्धिंगत करावा ही विनंती स्वागतोत्सुक प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे संस्थापक, अशोक भोसले अध्यक्ष, सुरेश राऊत उपाध्यक्ष, प्रा. डॉ. सुरज रोंगे, सचिव, सर्व विश्वस्त, श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर (स्वेरी) आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस ) गोपाळपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी केली आहे.
More Stories
पंढरपूर येथे पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे नागपंचमी हा सण अतिशय उत्साहात साजरा झाला.