07/09/2025

पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा झेंडा

आता मुंबई आणि पुण्याला जाण्याची गरज नाही , पंढरपुरातच होणार डोळ्याचे प्रत्यारोपण लाईफ लाईन मध्ये उद्या नेत्रसेवेचा शुभारंभ

पंढरपूरच्या वैद्यकीय व्यवसायाचं नाव घेतलं की , समोर येते ते , लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल.

पंढरपूर प्रतिनिधी,

डॉक्टर मंजुषा देशमुख आणिडॉ. संजय देशमुख यांनी लावलेलं हे रोपट आता विस्तारताना दिसतय पंढरपूरच्या लाईफ लाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सोमवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी नेत्रसेवेचा शुभारंभ होत आहे. डॉ. विश्वजीत रमेश देशमुख हे नेत्ररोग तज्ञ या ठिकाणी सेवा देणार आहेत.

बुबुळ प्रत्यारोपणासारख्या किचकट शस्त्रक्रिया ही आता येथे पार पडणार आहेत. यासाठी लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सज्ज झाले आहे. या नेत्र सेवेचा शुभारंभ रमेशराव देशमुख आणि शुभांगी देशमुख या दाम्पत्याच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी प्रशांत परिचारक, आ. समाधान अवताडे, आ.अभिजीत पाटील, माजी आमदार शहाजी बापू पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख,कल्याणराव काळे, वसंत नाना देशमुख, भगीरथ भालके, जयसिंग नाना देशमुख, प्रशांत भैय्या देशमुख , डॉक्टर ऋतुजा उत्पात, डॉक्टर अमरसिंह जमदाडे, डॉक्टर अमित कुमार आसबे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमास नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. मंजुषा देशमुख आणिडॉ. संजय देशमुख यांनी केले आहे.