23/12/2024

भाळवणी जिल्हा परिषद गटात दिपकआबांच्या गाव भेट दौऱ्याचे अभूतपूर्व स्वागत…!

भाळवणी जिल्हा परिषद गटात दिपकआबांच्या गाव भेट दौऱ्याचे अभूतपूर्व स्वागत…!

भंडीशेगाव शेळवे आणि खेडभाळवणी गावात दिपकआबांना तुफान प्रतिसाद

सांगोला : तालुका प्रतिनिधी

सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत होत आहे. शनिवार दि २४ रोजी भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडीशेगाव, शेळवे आणि खेडभाळवणी या गावात दिपकआबांना तुफान प्रतिसाद मिळाल्याने भाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुपरहिट करू लागला आहे.

दिपकआबांच्या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समाधान काळे यांच्यासह खेडभाळवणी येथील माजी प्राचार्य आर डी पवार, सरपंच संतोष साळुंखे, मा उपसरपंच लक्ष्मण साळुंखे, माजी प्राचार्य डी.जे. साळुंखे, शहाजी साळुंखे, बिभीषण पवार, भारत साळुंखे, ज्ञानोबा पवार, राहुल पवार, अनंता घालमे, शहाजी पाटील, सचिन घालमे, पोपट घालमे, प्रकाश पवार, बाळासाहेब पवार, रघुनाथ साळुंखे व धोंडीबा साळुंखे भंडीशेगाव येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ माने, गंगाराम विभुते, विजय कदम, गणेश पाटील, संजय रणखांबे, नवनाथ माने, विश्वास सुरवसे, रामकृष्ण कवडे, रमेश शेगावकर, सतीश रणखांबे, ज्ञानेश्वर गिड्डे, विलास यलमार, संतोष ननवरे, भास्कर ननवरे, मोहन घाडगे, चांद लांडगे आणि धोंडीराम चव्हाण तर शेळवे येथील दशरथ पाटील अनिल गाजरे तुकाराम गाजरे शशिकांत नागटिळक किरण गाजरे परमेश्वर आसबे सुधाकर गाजरे समाधान गाजरे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


शनिवार दि 24 रोजी पंढरपूर तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडीशेगाव या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर, वेताळवाडी, गणेश मंदिर परिसर, आझाद चौक परिसर, बुद्ध विहार १ आणि २ परिसर, अण्णाभाऊ साठे नगर, डोंबारी वस्ती परिसर, शाहूनगर परिसर, कोळ्यांचा मळा परिसर, माने वस्ती, चव्हाण वस्ती, माळुंगकर वस्ती, कवडेवस्ती, सुरवसेवस्ती, उपरी रोड परिसर तसेच चौगुले वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला. तसेच शनिवारी दुपारच्या सत्रात शेळवे गावातील देवीचे मंदिर, वकील वस्ती, दंडवस्ती, खंडोबा मंदिर परिसर, बंडाचा मळा परिसर, दादाचा मळा परिसर, तसेच बरडवस्ती व खोराडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी व्यथा जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तर शनिवार दि 24 रोजी सायंकाळच्या सत्रात खेड भाळवणी गावातील पवारवस्ती जुना अकलूज रस्ता परिसर, रेणुकानगर, शिवाजीनगर, जिजाऊनगर, संभाजीनगर व मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

चौकट ;

१) भाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटातील मतदारांकडे पाहिले होते. परंतु प्रथमच माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे प्रत्येक गावातील वाड्यावर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत. भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्यांनी जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला आहे. दिपकआबांच्या कामाची आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी दिला.