23/12/2024

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे आवाहन

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे आवाहन

नदीपात्रात पाणी सोडल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पंढरपूर प्रतिनिधी,

उजनी व वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने उजनी व वीर धरणातून भीमा नदी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने जुना दगडी पूल पाण्याखाली गेला असून इस्कॉन टेम्पल परिसरातील काही भाग पाण्याखाली गेला आहे. बॅरिगेट लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नदीकाठच्या गावातील नागरिकांना बंधाऱ्यावरून पाणी वाहत असताना वाहतूक करणार नाही होडी चालवणार नाही. कपडे धुणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच बंधाऱ्यावर योग्य पोलीस बंदोबस्त नेमला आहे.अशी माहिती टि. वाय. मुजावर पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी दिली.