24/10/2025

एकपात्री नाटक स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन चे यश

एकपात्री नाटक स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन चे यश


चंदुकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने
तुम्ही नाटकी आहात! या सदराखाली एकपात्री नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पंढरपुरातील सर्व शाळांनी सहभाग घेतलेला होता. यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेतील इ.६ वी मधील चि.आयान ताहेर मुलाणी या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला.

चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्यावतीने प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला.आयानने या स्पर्धेमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या आयुष्यावर आधारित एक प्रसंग एकपात्री नाटकाद्वारे सादर केला. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री. रोहन परिचारक व प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी अभिनंदन केले.

You may have missed