23/12/2024

पंढरपूरचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर

पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर

पंढरपूर प्रतिनिधी,

जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर.15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिन असल्याने प्रशासकीय सेवेत आपल्या कार्याचा असा उमटविणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जातो.त्यातच पोलीसांची खाकी वर्दी म्हटलं की जनतेमध्ये तीव्र नाराज असलेली पाहायला मिळते मात्र त्यामध्ये देखील काही अधिकारी वर्ग असा असतो की जो आपल्या ध्येयाशी आणि कर्तव्याशी प्रामाणिक राहून खाकी वर्दीतील आणि सर्वसामान्य जनतेतील आपलेपणा जपणारा अधिकारी हा सर्वोत्कृष्ट ठरतो.

असाच एक अनुभव सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट सेवा करून सध्या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध सामाजिक राजकीय तसेच प्रशासकीय सेवेतून कौतुक करण्यात येत आहे . पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांची खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारा व्यक्ती म्हणून ओळख आहे. त्यांचा सन्मान सोलापूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.