७८ वा स्वातंत्र्याचा महोत्सव कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये संपन्न
पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये आज दि.१५ ऑगस्ट रोजी पंढरपुरातील नामांकित बालरोगतज्ञ डॉ.नीरज शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन स्वातंत्र्योत्सव संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्राचार्या मा.सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई, संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.दिलीप शहा, माजी नगरसेवक तुकाराम राऊत व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्वातंत्र्य उत्सवांमध्ये प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळी प्रशालेतील उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पारितोषिके देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली सादिगले व चंद्रकला फाळके यांनी केले. तर आभार श्री गिरीश खिस्ते यांनी मानले.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम