स्वेरीच्या डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजित गिड्डे यांचे संशोधन सातासमुद्रापार
नेदरलँडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधनपर लेखाचे सादरीकरण
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजीत गिड्डे यांनी नुकत्याच युरोपमधील अॅमस्टरडॅम (नेदरलँड) मध्ये आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपला संशोधनपर लेख सादर केला.
संशोधनाच्या निमित्ताने स्वेरीचे प्राध्यापक सातासमुद्रापार जाऊन आपल्या संशोधन कार्याचे सादरीकरण करत आहेत, ही एक विशेष बाब आहे. डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजित गिड्डे यांच्या परदेश वारीची ही पहिलीच वेळ असून त्यांनी त्या ठिकाणी आपला शोधनिबंध सादर केला. या संशोधन पर लेखाच्या सादरीकरणातून तेथे उपस्थित विदेशी संशोधक तथा प्राध्यापकांनी स्वेरीच्या प्राध्यापकांची पाठ थोपटली. अॅमस्टरडॅम (नेदरलँड) मध्ये ‘इंटरनॅशनल कॉंग्रेस ऑन साउंड अँड व्हायब्रेशन (आयसीएसव्ही-३०)’ या विषयावर दि. ०८ जुलै ते दि. ११ जुलै २०२४ दरम्यान चार दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. यामध्ये स्वेरीच्या डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजित गिड्डे यांनी ‘युटिलायझिंग पोरस् मेडीयम इन डायरेक्ट इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग अॅप्लीकेशन फॉर नॉईज रिडक्शन’ या विषयावर आपला संशोधन पेपर सादर केला. स्वेरी मध्ये भारताचे जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या माध्यमातून ‘शिक्षक दिना’चे औचित्य साधून दि. ०५ सप्टेंबर, २०१२ साली खऱ्या अर्थाने संशोधनाचे जाळे विणले गेले. तेथून स्वेरी मध्ये संशोधन विभाग हा अधिकाधिक मजबूत होत राहिला. यापूर्वी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्र.अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांच्यासह स्वेरीतील प्राध्यापकांनी संशोधनाच्या निमित्ताने परदेश दौरे केले आहेत. या चार दिवसीय परिषदेत इतर देशातील संशोधक शास्त्रज्ञांनी देखील सहभाग घेतला होता.
या संशोधनातून डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजित गिड्डे यांनी शोध पेपर मधून ‘इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग अॅप्लीकेशन मध्ये फॅनमुळे होणारा आवाज कमी करण्याच्या नवीन पद्धती’ वर लक्ष वेधले. या संशोधकांना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. डॉ. हर्षवर्धन रोंगे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून पदवी पूर्ण केल्यानंतर देश पातळीवर घेतल्या जाणाऱ्या गेट परीक्षेमधून रँक मिळवून मुंबईतील आयआयटी मधून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर तेथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून पीएच.डी. चे शिक्षण घेतले. तर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या प्रेरणेने व अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रणजित गिड्डे यांनी पीएच.डी. चे शिक्षण घेतले. डॉ. हर्षवर्धन रोंगे व डॉ. रणजित गिड्डे यांनी एकत्रित परदेश दौरा करून आपला संशोधनपर लेख सादर केल्याने स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, अभियांत्रिकी पदवीच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही. मांडवे, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले.
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम