पदपथावर वाढलेली झाडे झुडपे नगरपालिका काढणार का ?-सौ सुनेत्राताई विजयसिंह पवार
पंढरपूर शहरात रस्त्याचे कामे होऊन रस्ते चांगले झाले ही पंढरपूरकरांसाठी चांगली गोष्ट आहे. रस्त्याच्या दुतर्फा पदपथही निर्माण केले गेले. परंतु सध्या या पदपथावर अनेक ठिकाणी झाडे झुडपे वाढलेली आहेत.पदचारी लोकांना याचा त्रास होत आहे.तसेच बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन वरती जाळ्या बसवलेल्या नाहीत. यामुळे प्लास्टिकच्या अनेक वस्तू जाऊन ड्रेनेज तुंबण्याची ही शक्यता आहे. चालू वर्षी पाऊस ही जास्त असल्याने पंढरपूर नगरवासीयांना याचा प्रचंड त्रास होऊ शकतो. नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देऊन पदपथावरील झाडे झुडपे काढणार का? ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन वरती जाळ्या नाहीत तिथे जाळ्या बसवणार का? की एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार ?
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांची मागणी
महिला बचत गट,वार्षिक सर्वसाधारण सभा व महीला मेळावा संपन्न