23/12/2024

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद

पहिल्याच दिवशी कोळा परिसरात आबांनी हजारो नागरीक आणि महिलांशी साधला संवाद

सांगोला : तालुका प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील रविवार दि ७ जुलै पासून सांगोला तालुक्यातील वाड्या वस्त्यावर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे रविवार ७ रोजी दिवसभर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कोळा परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला. पहिल्याच दिवशी माजी आमदार दिपकआबांच्या गावभेट दौऱ्याला कोळा परिसरातील नागरिकांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिल्याने सोशल मीडियावर आबांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या गावभेट दौऱ्यात कोळा परिसरातील शेकडो महिलांनी आपल्या व्यथा दिपकआबा पुढे मांडल्या.

आबांनीही क्षणाचा विलंब न करता “ऑन द स्पॉट” कोळा परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. रविवार दि ७ रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कोळा ता सांगोला येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे आणि ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. कोळा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी आमदार दिपकआबांचे पारंपरिक गझी ढोल आणि हलग्यांच्या निनादात स्वागत केले. रविवारी दिवसभर दिपकआबांनी कराडवाडी, कोंबडवाडी, मदनेवस्ती, माळेवाडी, गुंडाळेवस्ती, इराचीवाडी, बोधगिरेवस्ती या वाड्यावस्त्यावर जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.

तसेच कोळा गावभागातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी संभाजी तात्या आलदर, पै. हरी सरगर, शिवाजीराव कोळेकर, महेश ओतारी, शहाजी हातेकर, भारत आलदर संदिपान आलदर, सुरेश कचरे, अजय पडळकर, दादा कोळेकर, उत्तम हांडे, नामदेव आलदर, मदन पाटील, मारुती कोळेकर ,दादा कोळेकर, मारुती सरगर, दादा आलदर, विजय पांढरे ,शिवाजी आलदर, विनायक आलदर ,प्रतीक आलदर, विनोद काटे, सतीश काटे, धनंजय काटे, भीमराव काटे, नंदू मोरे, अजित मोरे, नामदेव हातेकर, रामचंद्र हतेकर, संभाजी हातेकर, विजय आलदर, शिवाजी आलदर ,काकासाहेब पांढरे सर ,विष्णू सरगर, संभाजी गोडसे, दत्ता सागर, साहेबराव गुंडाळे,पांडुरंग आलदर, अमोल कोरे, विनोद देशमुख, शहाजी हातेकर, तुकाराम आलदर ,दीपक माने, शंकर सोनवणे ,संतोष करांडे, अमोल माने, लक्ष्मण सरगर, पांडुरंग वावरे, सुभाष सरगर ,तातोबा सरगर , अनिल सरगर ,अर्जुन सरगर ,बिरा सरगर, तानाजी सरगर ,नवनाथ करांडे, जगन्नाथ घाडगे, दादा करांडे ,दादा कोळेकर, श्रीमंत सरगर ,महादेव पुजारी , रावसाहेब आलदर ,ईश्वर घाडगे ,दादा सरगर ,दादा बोधगिरे, समाधान सरगर, सुखदेव,करचे, ज्ञानू मेटकरी, मुरलीधर सरगर, संतोष सरगर, महादेव सरगर ,शिवाजी सरगर, शंकर सरगर, अकिब पटेल, अस्लम पटेल आदी उपस्थित होते.सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच नेत्याने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर आणि वाड्यावस्त्यांवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असल्याने सांगोला तालुक्यात माजी आमदार दिपकआबांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे प्रचंड उत्साहात स्वागत होत आहे. पहिल्या दिवशी वयोवृध्द नागरिक तसेच महिला आणि विशेषतः युवकांनी या दौऱ्यात आपल्या समस्या मांडल्या. यावेळी जागेवरच सबंधित विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संपर्क करून नागरिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. चौकट ; १) महिलांचा उत्स्फूर्त सहभाग ; वाड्यावस्त्यावर औक्षण करून केले आबांचे स्वागत कोळा परिसरातील वाड्यावस्त्यांवर माजी आमदार दिपकआबांचे उत्स्फूर्त स्वागत केले. आबांच्या या दौऱ्यात महिलांचा मोठा सहभाग होता. प्रत्येक ठिकाणी महिलांनी औक्षण करून आबांचे स्वागत केले आणि आपल्या व्यथा आबांसमोर मांडल्या आबांनी जागेवरच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांच्या समस्या सोडविल्या. तसेच महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले. २) सोमवार दि ८ रोजी दिपकआबांचा या गावात असणार गावभेट आणि जनसंवाद दौरा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गाव भेट आणि जनसंवाद दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार दि ८ जुलै रोजी स ९.३० ते ११.३० दरम्यान इटकी, ११.३० ते १.३० दरम्यान कटफळ, ३ ते ५ दरम्यान खवासपूर आणि ५ ते ७ दरम्यान लोटेवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत तरी या गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील यांनी केले. फोटो ;