23/12/2024

डॉ.होमी भाभा बाल- वैज्ञानिक स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन चा विद्यार्थी संग्राम यशस्वी!!!

डॉ.होमी भाभा बाल- वैज्ञानिक स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन चा विद्यार्थी संग्राम यशस्वी!!!

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेचा इ.६ वी मधील विद्यार्थी संग्राम राजेंद्रनाथ सावळकर याने डॉ. होमीभाभा बाल- वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घेतलेला होता. ही स्पर्धा ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्यामार्फत घेण्यात आली होती. या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख विश्वस्त रोहन परिचारक, प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी अभिनंदन केले.