कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेचा विद्यार्थी इस्रोला भेट देणार…
कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेचा इ.५ वी मधील विद्यार्थी आर्णव सुशेन मुळे याने भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या २८ विद्यार्थ्यांमध्ये “इस्रो” सहलीसाठी स्थान मिळवले. भारत टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेमध्ये इ. १ ली ते ८ वी चे राज्यभरातून एकूण २०००० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. यामधून फक्त २८ विद्यार्थ्यांची निवड इस्रो भारतीय अंतराळ संशोधन केंद्र सहलीसाठी झालेली आहे.
यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेचा इयत्ता पाचवी मधील विद्यार्थी चि.अर्णव सुशेन मुळे याने १५० पैकी १४६ गुण मिळवत इस्रो सहलीचा मान मिळवून कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे प्रमुख विश्वस्त रोहन परिचारक, प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी अभिनंदन केले.
More Stories
कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये क्रीडा सप्ताह संपन्न.
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत राबविला ‘नो फायर क्रेकर्स..सेफ नेचर ‘ उपक्रम.
युवा चित्रकला स्पर्धेमध्ये कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश.