23/12/2024

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त सांगोल्यात विविध कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी सांगोल्यात ध्वजारोहन व विविध कार्यक्रम सांगोला ; तालुका प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी म्हणजेच २५ व्या वर्धापनदिनी सांगोला येथील मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील संपर्क कार्यालय तथा राष्ट्रवादी भवन येथे सकाळी १० वा. १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला. 10 जून 1999 रोजी स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोम १० रोजी २५ वा रोजी राष्ट्रवादी काँग्रेस सांगोला यांच्या वतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शिवाजीराव कोळेकर, शहराध्यक्ष तानाजी (काका) पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सखुबाई वाघमारे, विधानसभा मतदारसंघाध्यक्ष सुचिता काकी मस्के, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, माजी नगरसेवक शिवाजी बनकर, ॲड.संपतराव पाटील, सतीश सावंत, दिलीपकाका मस्के, सुनील काका गायकवाड, विश्वनाथ चव्हाण, तुकाराम आळसुंदकर, बिरा बंडगर, चंद्रकांत शिंदे, सूर्याची खटकाळे, गिरीश गायकवाड, विजय गंभीरे, कार्याध्यक्ष संभाजी हरिहर, माजी सरपंच संतोष पाटील, प्रवक्ते महादेव कांबळे, वस्ताद बंडगर, बिरा गेजगे, रामदास काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल सुरवसे, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद गौस मुजावर, प्रांतिक सदस्य सतीश काशीद, हंगिरगेचे माजी सरपंच सुरेश काटे, नितीन सावंत, युवकचे शहराध्यक्ष रवी चौगुले, ज्ञानेश्वर शिंदे, महादेव शिंदे विनोद रणदिवे, पोपट खाटीक, अस्लम पटेल आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो ;