23/10/2025

कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये भरघोस यश

कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे नॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये भरघोस यश

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेचे इ.३ री ते ७ वी चे विद्यार्थी बेळगाव येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते. यामध्ये एकूण ३५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांमधून प्रशालेच्या ३५ विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री.अमोल सर, शिवम सर व सौ प्रज्ञा मॅडम यांचे तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे प्रमुख विश्वस्त रोहन परिचारक व प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी अभिनंदन केले.

You may have missed