23/12/2024

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात साजरी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती उत्साहात साजरी

मार्गदर्शन.सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या नागपूर

दिनांक २३ जून २०२४ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी दिप पुजन, राॅली, व्याख्यान, नवोदित अधिकारी व कर्मचारी यांचा व १०,१२ विद्यार्थी सत्कार व समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या भरगच्च कार्यक्रमासाठी व्यासपीठवर उपस्थित डॉ विकास महात्मे साहेब माजी खासदार राज्यसभा सदस्य,क्रिण्णा खोपडे ,विधायक पूर्व नागपूर, पांडुरंग मेहर भवानी मंदिर ट्रस्ट्री, राजकुमारी सेलोकर माजी नगरसेविका,मिनाताई अतकरी माजी नगरसेविका,भगवती पाल अध्यक्ष, डॉ विनोद बरडे,सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या ईत्यादी उपस्थित होते.मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सर्व मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.सौ वंदना विनोद बरडे यांनी अहील्यादेवी होळकर यांच्या विचारांवर आदर्शांवर प्रकाश टाकला.आणी आताची परिस्थिती व अहील्यादेवी होळकर यांच्या काळातली परीस्थिती यातील फरक समजावून सांगितला.आणी त्याकाळी कूठल्याही सूखसूविथा नसतांनी २९ वर्ष आदर्शवत राज्यकारभार केला.आणी आता आपल्याला एवढ्या सुखसुविधा असतांनीही आपणं त्यांच्या एक कार्य सुध्दा व्यवस्थीत करून शकतं नाही.तर आपणं निव्वळ जयंती साजरी करून जमणार नाही तर त्यासाठी आपल्याला त्यांच्या आदर्शांवर काम करावे लागेल.म्हणून मूलांनी चांगला अभ्यास केला पाहिजे.सर्वांनी आपलीं जिवन शैली बदलायला पाहिजे.आरोग्यदायी जिवनशैलीचा उपयोग केला पाहिजे.अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला, शाळां बांधल्या.पाणवटे बांधले.न्यायासाठी सुध्दा अहील्यादेवी एकनिष्ठ होत्या.शंकराच्या, महादेवाच्या पुजक होत्या.निव्वळ पूजाच करतं बसल्या नाही तर शांततेने लढाया पण लढल्यात.अश्या आदर्श राजकारणी ,समाजकारणी, रणरागिणी,विरांगणा,लढव्व्यी अश्या अनेक उपाध्या मिळालेल्या पुण्यश्लोक राजमाता ,राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.त्यांचा आदर्श घेवुन आपणं आपले आयुष्य सार्थकी लावावे सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर