23/12/2024

आ आवताडे यांची आज दुध उत्पादक व दुध संकलन संस्थाचालकांसमवेत बैठक

आ आवताडे यांची आज दुध उत्पादक व दुध संकलन संस्थाचालकांसमवेत बैठक

प्रतिनिधी- मंगळवेढा तालुक्यातील सर्व दुध उत्पादक व दुध संकलन संस्थाचालकांसमवेत मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची आज बुधवार दिनांक २६ जून २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.सदर बैठकीमध्ये दूध उत्पादक व दूध संकलन संस्थाचालकांच्या विविध अडी-अडचणी, दुध दर व इतर विविध विषयांवर आमदार आवताडे हे संवाद साधणार आहेत. तालुक्यातील अनेक शेतकरी व दूध उत्पादक पशुपालकांचे दूध व्यवसाय हे दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रमुख जोडधंदा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या व्यवसायावर आपली उपजीविका भागवणाऱ्या दोन उत्पादकांना व दूध संकलन संस्थाचालकांच्या यावेळी असणाऱ्या विविध समस्या आमदार आवताडे हे जाणून घेणार आहेत.तरी या बैठकीसाठी तालुक्यातील सर्व दूर उत्पादक व दूध संकलन केंद्र करणाऱ्या संस्थाचालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार समाधान महादेव आवताडे जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांनी केले आहे.फोटो- समाधान आवताडे