06/09/2025

पंढरपूर येथे पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025

पंढरपूर येथे पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025,

पंढरपूर नगरपरिषद व पंढरपूर पोलिस प्रशासन यांच्या वतीने बक्षीसांचा वर्षाव

पंढरपूर प्रतिनिधी —
पंढरपूर नगरपरिषद व पंढरपूर पोलिस प्रशासन यांच्या वतीने”स्वच्छ-सुंदर हरित पंढरपूर” या संकल्पनेवर आधारित पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली आहे.

पंढरपूर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, या स्पर्धेत सहभागी व्हावे, आणि पर्यावरण-स्वच्छता जनजागृती सोबतच आकर्षक बक्षीसे जिंकण्याची संधी मिळवा.

सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्या मंडळांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून त्यासाठी प्रथम क्रमांक – ₹ 21,000/- + सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक – ₹ 15,000/- + सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक – ₹ 10,000/- + सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.तसेच यासाठी स्पर्धेतील निकष असणार आहे ते पुढीलप्रमाणे पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट ध्वनीप्रदूषणमुक्त वातावरण, पारंपरिक वाद्यांचा वापर,सामाजिक उपक्रम,प्लास्टिक मुक्त जनजागृती व डस्टबिनचा वापर,वृक्षारोपण व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता या निकषांवर आधारित विजेता घोषित करण्यात येणार आहे.

यासाठी नाव नोंदणीची तारीख 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2025 अशी राहिल तर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लगेच नोंदणी करा यासाठी संपर्क अधटराव
9370853285,जोजारे 7020286147 पवार (पोलीस हवालदार)9823990732 तसेच 4075/अ, भाळुंले चौक, पंढरपूर येथे कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करु शकता,व नोंदणीसाठी QR कोड स्कॅनचा देखील वापर करु शकता.अशी माहिती दिली व आव्हान देखील पंढरपूर नगरपालिका व पंढरपूर पोलिस प्रशासन यांच्या वतीने करण्यात आली आहे.