ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत
न.प.शाळा क्रं.९ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन
फलटण प्रतिनिधी:
काल 16 जून पासून नवीन शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. या शाळेच्या पहिल्या दिवशी संपूर्ण राज्यभरात विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमाच्या द्वारे स्वागत करण्यात आले.

फलटणमध्येही कालच्या दिवसाचे औचित्य साधून नगरपरिषद शाळा क्रमांक ९ च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करत विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यामध्ये ढोल ताशांच्या गजरात पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली आणि विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारातून आत प्रवेश करत असताना फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आले.

तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तके व दप्तर वाटप करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.अर्चना बामणे,शाळेचे मुख्याध्यापक संदीप निकम सर, व्यवस्थापन समिती सदस्य,शिक्षक समाधान भोई तसेच अनेक पालक उपस्थित होते.
More Stories
आ.अभिजीत पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ
माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण