19/07/2025

वाणीचिंचाळेत राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती निमित्त अभिवादन

वाणीचिंचाळेत राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती निमित्त अभिवादन

सांगोला प्रतिनिधी,

अहिल्यादेवी होळकर यांनी शेतकरी व जनतेचा विचार करून विहिरी पानवटे धर्मशाळा बांधल्या मंदिरे बांधली जनतेला प्रामाणिक न्याय देण्याचे कार्य राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केले असल्याचे मत बबन टेकनर यानी सांगितले.

यावेळी सोनगाव तालुका फलटणचे माजी सरपंच जयाप्पांना बेलदार व सरपंच जितेंद्र गडहिरे यांच्या हस्ते प्रथमेच पूजन केले. अहिल्यादेवी ने देशभरात हजारो मंदिर उभा केली. 28 वर्षे दौलतीचा प्रामाणिक कारभार करून उत्तम प्रशासन चालवले.

पर्यावरणासाठी शेतकऱ्यांना वीस झाडे लावली पाहिजे असा नियम करून पुरुषप्रधान संस्कृतीत कर्तुत्ववान स्त्रिचा इतिहास आदर्शवत असल्याचे माजी चेअरमन डी एस निळे याणि सांगितले यावेळी अहिल्यादेवी मंडळाचे अध्यक्ष दामोदर सोपे , माजी सरपंच बाबुराव सोपे , माझी उपसरपंच बापूदिन शेख, माझी उपसरपंच नामदेव घुणे,बंडू सोपे, नवनाथ येडगे, मंडळाचे उपाध्यक्ष रावसाहेब टेकनर, गुंडा जुजारे,लक्ष्मण पाटील ,बाळू बनसोडे, दत्ता सोपे, दयानंद गरंडे, भारत येजगर,शशिकांत निळे ,संभाजी निळे ,पत्रकार सचिन गायकवाड, सोमेश्वर पाटील अण्णा गरंडे ,खांडेकर त्यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.