सत्यवादी शिक्षक एका सामान्य व शेतकरी कुटुंबातून पुढे आलेलं एक नेतृत्व.
पंढरपूर प्रतिनिधी,
गावातील 5 सहकाऱ्यांच्या साथीने शिक्षण गावातल्या मुलांना मिळाव या हेतू तून.. गाव शिक्षणात मागे राहू नये म्हणून गावात शाळा सुरू करण्याचे स्वप्न उराशी बाळगणं आणि गावातील मिळालेल्या सहकारी यांच्या साथीने कर्ज काढून शाळा शाळा सुरू करणे. वीस हजार रुपयांचे 60 हजार रुपये व्याजासहित देणे असे किती तरी सावकार शाळेसाठी झाले ….
व्याज काढून शाळा चालवणारी महर्षी म्हणजे विनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी.
त्यातीलच एक अध्यक्ष माननीय विलासजी रामचंद्र देठे यांचा आज सेवा समाप्ती.
बापू सर म्हणजे विद्या विकास प्रशालेत मधील सर्व मुलांच्या मनातलं एक आदर्श शिक्षक.
सर नव्हे ते सर्वांचे बापू होते…
लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व वर्गातली मुलं तक्रार सांगायची तरी कोणाला …!
तर बापूला सांगायची…!
बापू दोघांचाही न्याय समान करायचे.
सुरुवातीला दोन-तीनदा
खांद्यावर हात टाकून
समजून सांगायचे.
चौथ्या वेळेस चूक झाली
तर शिक्षा करायचे.
शिक्षा करून दुसऱ्या दिवशी त्या मुलाला भेटून खांद्यावर हात टाकून त्याला सांगायचे हे चुकीच आहे. बापूंनी विद्यार्थी म्हणून मुलं अशी जपली.

सामान्य कुटुंबातून आलेला हे
शिक्षक आई-वडिलांची शिकवण आणि
आई वडिलांची कष्टाची जाणीव आपण नेहमी आयुष्यभर जपली पाहिजे आणि जपत असताना आयुष्य प्रामाणिक व नेहमी खरेपणाने आपल आयुष जपलं पाहिजे.
आपण कुणाचा रुपया बुडवायचा नाही …
कुणाचा रुपया खायचा नाही.
कुणाचा तळतळाट घ्यायचा नाही.
ही तत्वे आयुष्यभर बापूंनी जपली.
आणि या 24 वर्षांत मुलांनाही शिकवली.
बापूला देवधर्माचे फार वेड नाही. कारण बापूंचा चांगले कर्म करत राहायचं देवाला सारखे जायचे वेळच येऊ द्यायची नाही असा त्यांचा सिद्धांत असायचा.
पण वर्षातून चार पायी वारी करणारे बापू ज्यावेळेस पांडुरंगाला जातात त्यावेळेस पाया पडून बापू विठू माऊली कडे काय मागतात तर …
मला माझ्याकडून चांगलं कार्य घडू दे.
माझ्या मुळे कोणाच्या डोळ्यात पाणी होऊ देऊ नको.
“मला माझ्या आई-वडिलांनी दिलेली शिकवण जपू दे आणि हेच माझ्याकडून शेवटपर्यंत घडू दे.
हे मागणारे बापू सर मुलांच्या हृदयावर राज्य करतात..”
सर्व मुलांना आवडणारा शिक्षक म्हणजे बापू..
बापू हे व्यक्तिमत्व फार वेगळ आहे तोंडावर परखड बोलणारे ..स्पष्ट बोलणारे.
मनात जे आहेत ते बोलणारे हे व्यक्तिमत्व खूप निराळ आहे.
राग आला तरी चालेल परंतु समोर बोलायचं.
मनात एक आणि तोंडावर एक कधीच करायचं नाही.
गोरगरिबांना मदत करायची.
प्रत्येक दिवाळीला बापू घरात फराळ करत नाही…
पण पंढरपुरात पांडुरंगाच्या मंदिरासमोरील गोरगरिबांना फराळ वाटण्यासाठी बापू आचारी लावून दिवाळीचे वेगवेगळे पदार्थ बनवून घेतात.

दीड ते दोन किलोचा बॉक्स तयार करून ही फराळ वाटतात.
घरात मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल. ज्या महिला शेतातील कामासाठी येतात त्यांना साडी पूर्ण कपड्याचा आहेर घ्यायचा .
कामाला आलेल्या महिलांना एक ओळ कमी झाली तरी चालेल(थोडेफार काम कमी झाले तरी चालेल) पण कामावर आल्यावर सकाळी चहा देणं. अकरा वाजता जेवणाच्या वेळेस घरातील भाकर जी भाजी बनवली आहे ते देण.
कामगारांना अश्या प्रकारे जपत. त्यामुळे लॉकडाऊन च्या वेळेस सुद्धा या महिला आपल्या जीवावर उदार होऊन बापूच्या मळ्यामध्ये कामाला जात होत्या.
बापूला पुस्तक वाचायचा वेड आहे
एका वाचनालयातील आणलेली पुस्तक आपल्याकडून हरवली म्हणून त्यांना दोन-तीन हजाराचे पुस्तक त्यांना घेऊन देणारे बापू.
घराच्या बंगल्याची वास्तुशांतीला शाळेतील सर्व मुलांना जेवण देणारे बापू.
शांतता आणि संयम याचे उदाहरण म्हणजे बापू . कर्जाचा डोंगर असणारे बापू नेहमी शांत संयमी राहतात.
शेतीमध्ये कित्येकदा द्राक्ष आधुनिक पद्धतीने पिकवली परंतु निसर्गाच्या समोर बापू बऱ्याच वेळा दु:खी झाले तरी नेहमी शांत राहिले. आधुनिक तंत्रज्ञान आणि परिपूर्ण ज्ञानावर आधारित शेती बापू करत असताना बऱ्याच वेळा निसर्गाने खूप वेळा तोंडातील घास हिरावून घेतला..
तरीही बापू परमेश्वराला पांडुरंगावर कधीच नाराज झाले नाहीत .
कर्जाचा डोंगर असताना सुद्धा बापूंनी आतापर्यंत भावांना जमीन वाटून..
आपण वेगळे राहू.
असा विचार आतापर्यंत केला नाही.
आई-वडिलांनी सांगितलेला शब्द शेवटपर्यंत निभावला.
बापू ,म्हणतात की “माझ्या वडिलांनी आणि आईने सांगितलं होतं.. विलास या दोन लेकरांचा सांभाळ कर.” आणि बापू ने आत्तापर्यंत 35 ते 40 वर्षांमध्ये कधीच वेगळ राहायचा कधी विचार केला नाही.
या कलियुगामध्ये रक्ताचा भाव कसा जपावा हे बापू कडून शिकायला पाहिजे. नाती कशी टिकवावी हे जातीवंत उदाहरण म्हणजे बापू…!
बापू तुमच्या कार्याला सलाम तुम्ही नेहमी आदर्श राहाल.
More Stories
5 वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
नगरपरिषद पंढरपूर आषाढी यात्रा 2025 यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन-मुख्याधिकारी महेश रोकडे