06/09/2025

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडून स्तुत्य उपक्रम; ‘यासाठी’ होतंय सर्वत्र कौतुक

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याकडून स्तुत्य उपक्रम; ‘यासाठी’ होतंय सर्वत्र कौतुक

पंढरपूर प्रतिनिधी,

‘रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान’ या प्रमाने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर आयोजित करून पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वेगळा आदर्श आणि उपक्रमशील कार्यक्रम राबविण्यात आला.अनेक सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांना रूग्णालयात उपचार घेत असताना आणि अपघात झाल्यानंतर रक्तावाचून तडफडून आपल्या आयुष्याला मुकावे लागते.

अशाच सर्व सामान्य गोरगरीब नागरिकांना अडचणीच्या काळात रुग्णांच्या शरीराला रक्ताची कमतरता भासू नये म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा संकल्प पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातून घेण्यात आला.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील तितक्याच प्रमाणात जोरदारपणे मिळाला.

सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सो सोलापुर ग्रामीण, मा.प्रतिम यावलकर सहा.पो.अधि. सो.ग्रा., मा. यांचे मार्गर्शनाखाली डॉ.अर्जुन भोसले सो पोलीस उपअधिक्षक पंढरपुर उपविभाग पंढरपुर,मा.अंजना कृष्णा व्ही.एस.परिविक्षाधीन भा.पो.से. प्रभारी अधिकारी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे, मा.विश्वजीत घोडके पो.नि.पंढरपुर शहर पो.ठाणे, मा.मुजावर पो.नि. पंढरपुर तालुका पो.ठाणे असे आज रोजी दिनांक 01/05/2025 रोजी 01 मे महाराष्ट्र दिन,कामगार दिन तसेच पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे वर्धापन दिनानीमीत्त पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे येथे सामाजीक उपक्रम म्हणुन रक्तदान शिबीर आयोजीत केले होते

त्यावेळी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील स्वंयसेवक,शाळा,कॉलेजचे विद्यार्थी,पोलीस पाटील,कामगार,संघटनेचे कार्यकर्ते तसेच पंढरपुर उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकुण 217 जणांनी रक्तदान केले.

या उपक्रमशील कार्यक्रमाचे भव्य आयोजन केल्याने सर्व स्तरावर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.