चेअरमन श्रीनिवासदादा करे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा!
(विविध सामाजिक व आरोग्य विषयक शिबिरे घेऊन नवतरुण युवकांपुढे ठेवला श्रीनिवासदादा करे यांनी आदर्श)
(सांगोला तालुक्यातील नवयुवक तरुणाने सामाजिक उपक्रम राबवित केला आपला २७ वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा)
श्रीनिवासदादा मधुकर करे चेअरमन मायाक्कादेवी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड घेरडी, युवा ग्रामपंचायत सदस्य व भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्या २७व्या वाढदिवसानिमित्त सांगोला तालुक्यातील घेरडी येथे विविध सामाजिक उपक्रमांनी राबविण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने युवा ग्रामपंचायत सदस्य चेअरमन मा. श्रीनिवासदादा करे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा, मिनी साउंड स्पर्धा व भव्य रक्तदान शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रम युवा ग्रामपंचायत सदस्य चेअरमन श्रीनिवास करे यांच्या सर्व मित्र परिवाराने आयोजित केले होते.

मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा युवा सेना संपर्कप्रमुख सागरदादा पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख सांगोला तालुका दादासाहेब लवटे, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.मायाक्कादेवी अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्रीनिवासदादा मधुकर करे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पुढील आठवडा हा आरोग्य सप्ताह म्हणून संपन्न होणार असून यामध्ये सांगोला विधानसभा मतदारसंघातील व जिल्हा परिषद गटातील सर्व वयोवृद्ध नागरिकांची मोफत डोळे तपासणी व मधुमेही रुग्णांची नेत्र पटल तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सांगली येथील सुदर्शन हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी रवानगी करण्यात येणार असून अनेक महत्त्वपूर्ण शिबिर ही आयोजित करण्यात येणार आहेत.याचबरोबर घेरडी येथील मायाका देवी पतसंस्थेच्या प्रांगणामध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.

या रक्तदान शिबिरामध्ये नामदेव भैया सुरवसे, म्हाळू गावडेसाहेब, दादा करे सलीम खलिफा, बिरुदेव वगरे, रमेश बनसोडे, गणेश काकेकर, सागर बुंरगले,समाधान नलवडे,करण सूर्यवंशी, गणेश खुळपे, किरण माने, अनिल नाईक, विनायक स्वामी, प्रकाश दिवसे, समाधान खरात, बिरुदेव करे, साहिल यमगर, सुमित काकेकर, रामदास (हरी) घुटुकडे, विजय कोकरे, प्रशिक गंगणे, अविष्कार गावडे, सागर बुरुंगले, सुरज शेख, सुरज करे, विनायक कांबळे, आबा नवाळे, अक्षय हातेकर, व बालक कोष्टी या सर्व युवा सहकाऱ्यांनी सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोठे परिश्रम घेतले..
More Stories
स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे उद्या उद्घाटन समारंभ व पायाभरणी सोहळा
पंढरपूर येथे पर्यावरणपूरक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2025