08/01/2025

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा.

पंढरपूर (3 जानेवारी):

महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारी हा दिवस थोर महिला समाजसुधारक सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचा जन्मदिन, बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. पंढरपूर मधील कर्मयोगी विद्यानिकेतन येथे बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा होत असल्या कारणाने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कर्मयोगी शाळेतील महिला शिक्षकांनी केले होते. सावित्रीबाई फुले यांची जयंती असल्याकारणाने मुलांनी भाषण करून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. शिवम कचरे सरांनी इयत्ता थी च्या मुलांच्या साह्याने उत्कृष्ट नृत्य तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जीवन शैलीवर आधारित परिपाठ घेऊन सावित्री बाई फुले यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या.सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई ह्या होत्या.या प्रसंगी कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेच्या प्राचार्या सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या की,सध्या भारतामध्ये प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, परंतु काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती.

मुख्यत्वे महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मात्र त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आज भारतामधील मुली मुक्तपणे शिक्षण घेत आहेत. सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी स्त्री शिक्षणासाठी उभारलेल्या चळवळीमुळेच भारतामधील महिला विविध क्षेत्रात मोठी प्रगती करत आहेत.अश्या खेळीमेळीच्या आनंदाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. शेवटी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. अंजली उत्पात यांनी सगळ्यांचे आभार मानले.