08/01/2025

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ पंढरपूर शहर अध्यक्षपदी सचिन कुलकर्णी तर तालुका अध्यक्षपदी तानाजी जाधव व तालुका उपाध्यक्ष पदी नामदेव लकडे यांची निवड

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ पंढरपूर शहर अध्यक्षपदी सचिन कुलकर्णी तर तालुका अध्यक्षपदी तानाजी जाधव व तालुका उपाध्यक्ष पदी नामदेव लकडे यांची निवड

पंढरपूर- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ पंढरपूरच्या शहर अध्यक्षपदी शिवशाही न्यूज चॅनलचे संपादक सचिन कुलकर्णी यांची तर तालुका अध्यक्षपदी PPR न्यूज चॅनलचे संपादक तानाजी जाधव व तालुका उपाध्यक्ष पदी नामदेव लकडे यांची निवड करण्यात आली.6 जानेवारी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर सदर निवडी करण्यात आल्या. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाची बैठक जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे सर यांच्या उपस्थित पार पडली.

यामध्ये सचिन कुलकर्णी यांची एकमताने शहर अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली. सचिन कुलकर्णी हे सहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्न मांडले आहेत.यावेळी तालुका अध्यक्षपदी तानाजी जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली पत्रकारिता क्षेत्रातील कार्य व सामाजिक कार्य पाहता त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी विविध निवडी करण्यात आल्या. यामध्ये शहर कार्याध्यक्षपदी सोलापूर व्हायरलचे संपादक सोहम जस्वाल, शहर उपाध्यक्षपदी पुंडलिक समाचारचे संपादक विजयकुमार कांबळे,सचिवपदी वनप्लस मराठीचे धीरज साळुंखे, खजिनदारपदी दैनिक शोधचे सुशांत मोहिते, संघटकपदी महेश कदम, प्रसिद्धी प्रमुखपदी जगदीश डांगे यांची निवड देखील करण्यात आली.

तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तालुका उपाध्यक्षपदी लोकशक्ती न्यूज चॅनेल संपादक नामदेव लकडे, कार्याध्यक्ष गोपीनाथ देशमुख, सचिवपदी दाजी वाघमारे, संघटकपदी अमर कांबळे, प्रसिद्धी प्रमुखपदी पांडुरंग सूर्यवंशी, खजिनदारपदी स्वप्नील जाधव, सल्लागारपदी प्रशांत माळवदे यांची निवड करण्यात आली.यावेळी अजित देशपांडे, दिनेश खंडेलवाल, रवी सोनार, सूर्याजी भोसले, तानाजी सुतकर, नेताजी वाघमारे, दगडू कांबळे, गणेश चंदनशिवे, आशिषकुमार लांडगे,ज्योतीराम कांबळे,सचिन झाडे, गणेश महामुनी, स्वप्नील जाधव आदी उपस्थित होते.