22/12/2024

आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न

आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या

हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून घेतला शिबिराचा लाभ

आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

पंढरपूर प्रतिनिधी /-

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या ८५ वा वाढदिवस माढा शहर व तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त माढा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन आमदार अभिजीत पाटील मित्र परिवार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, माढा तालुका व शहर यांच्यावतीने करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.या शिबिरामध्ये १२१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तर सर्व रोग निदान शिबिरात २५५ नागरिकांनी तसेच या संपूर्ण आरोग्य शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला. या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी ५४ नागरिकांचे ऑपरेशन मोफत केले जाणार असून यामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप व तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ विलास बप्पा देशमुख, जिल्हा परिषद सदस्य भारतआबा शिंदे, ज्येष्ठ नेते दिलीपबापू देशमुख, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, राजाभाऊ चवरे, आनंदअप्पा कानडे, शहाजीआण्णा साठे, नितीनबापू कापसे, युवा नेते सुरज देशमुख,अविनाश देशमुख, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुठे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुवर्णाशिवपुरे, ॲड.रत्नप्रभा जगदाळे, डिव्हीपी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब महाडिक, ऋषिकेश बोबडे, विठ्ठलवाडीचे सरपंच हनुमंत जाधव, वेताळवाडीचे उपसरपंच दयानंद जाधव, दत्ता पाटेकर, अच्युत उमाटे, ऋषीकाका तांबिले, आबासाहेब साठे, जितूभाऊ जमदाडे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विलास मेमाणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश खंडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर लवटे, डॉ.अंजली शेळके, नेत्र तपासणीचे डॉ.अमोल बांगर, चव्हाण मॅडम, तसेच रक्त तपासणीसाठी अक्षय ब्लड बँकचे सहकारी उपस्थित होते…

चौकट :-माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.