22/12/2024

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत राबविला ‘नो फायर क्रेकर्स..सेफ नेचर ‘ उपक्रम.

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेत राबविला ‘नो फायर क्रेकर्स..सेफ नेचर ‘ उपक्रम.

पंढरपूर प्रतिनिधी,

पंढरपूर येथील श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये यंदाही फटाके न उडवण्याची विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली.दिवाळीत फटाके वाजवून पैशांचा अपव्यय तसेच आरोग्याला धोका पोहचविण्यापेक्षा त्या फटाक्यांवर खर्च होणारे पैसे वाचवून सकारात्मक, पर्यावरणपूरक काम करण्याची प्रतिज्ञा कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी घेतली.

या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.फटाक्यांच्या प्रचंड किंमतीमुळे वारेमाप पैसे खर्च होतातच. शिवाय त्याच्यातून होणारे हवेचे प्रदूषणही वेगळेच. त्याचा ध्वनीप्रदूषण हा तिसरा फटका. अशा केवळ विनाकारण खर्च व आरोग्याला घातक असलेल्या फटाक्यांना विरोध दर्शवण्यासाठी कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर च्या प्राचार्या डॉ प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी ‘No Fire Crackers.. Safe Natures’ पेटता फटाकडी होते निसर्गाची नासाडी’ या अभियानांतर्गत उपक्रम राबविला जातो.

याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त श्री. रोहन परिचारक यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके सर यांनी उपस्थिती दर्शिविली तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुंदर अश्या व्हिडिओ द्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पालक वर्गाला सामावून घेतले. तद्नंतर नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून फटाके उडवणार नाही,अशी शपथ घेतली.त्याच पैशातून सकारात्मक पर्यावरणपूरक काम करेन अशी प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. तसेच अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना मदत करून फटाके न उडवण्याचा निर्धार केला. यानुसार विद्यार्थ्यांकडून फटाके न उडवण्याची व समाजाला, निसर्गाला पूरक असे वातावरण निर्माण करण्याची अपेक्षा पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून सरदेसाई मॅडम यांनी व्यक्त केली.