23/12/2024

समाजसेवक निरंजन गडहिरे यांची सांगोला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड.

समाजसेवक निरंजन गडहिरे यांची सांगोला तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष पदी निवड.

वाणी चींचाळे – निरू भैय्या युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष आयु. निरंजन बळीराम गडहिरे यांच्या माध्यमातून होत असलेले अनेक वर्षांपासून सामाजिक , शैक्षणिक , विधायक कामे लक्ष्यात घेता तरुणांसाठी प्रेरणादायी असणारे नेतृत्वाला माजी

आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांनी पाठबळ देण्याचे ठरवून, युवा नेते यशराजे साळुंखे पाटील व युवक तालुका अध्यक्ष श्री अनिल नाना खटकाळे यांच्या हस्ते सांगोला तालुका युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली . निवडीनंतर निरंजन गडहिरे यांनी पक्षाची द्येय धोरणे लोकांच्या घरा घरात पोहचवण्याचे काम करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये निवड करण्यात आली.