डिकसळ येथील आश्रम शाळेचा जिल्हात डंका.
जिल्हास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विभागीय पातळीवर धडक.
सांगोला/प्रतिनिधी-
सांगोला तालुक्यातील डिकसळ आश्रमशाळेच्या १४ अन् १७ वर्षीय मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी धाव घेतली असून,अंतिम सामन्यात मोहोळ संघाना पाणी पाजत हा विजयाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. . तालुक्यातील डिकसळ येथील आश्रमशाळा मुलांना शिक्षणा बरोबर मैदानी खेळाचे धडे पहिल्यापासूनच देत असून,व्हॉलीबॉल खेळात गेली १० वर्षापासून ही शाळा जिल्ह्यात अव्वल ठरीत आहे.
यापूर्वीही विभागीय स्पर्धा गाजवून शाळेने नाव कमावलेले आहे.आज जिल्हास्तरीय स्पर्धा सोलापूर येथील आहेरवाडी येथे आयोजित केल्या होत्या.यामध्ये २० संघांनी सहभाग नोंदविला होता.यात मुलींच्या १४ वर्षीय व १७ वर्षीय अशा दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात मोहोळ संघाला हरवत विजय संपादित केला.यावर्षीही जिल्ह्यात डिक सळ आश्रम शाळेचा दबदबा कायम राहिला.यासाठी क्रीडा शिक्षक काकासाहेब कारंडे,भारत यादव यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्वांचे माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम भुसनर, प्राथमिकचे मुख्याध्यापक जितेंद्र जगधने यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष,सचिव,सर्व संचालक प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
चौकट–आम्ही जिल्ह्यातच अव्वलसांगोला तालुक्यातील डिकसळ येथील निवासी आश्रमशाळा जिल्ह्यातच अव्वल आहे.गुणवत्ते बरोबरच मुलांना मैदानी खेळाचे विशेष धडे देत,आजपर्यंत नवलोकिक मिळविला आहे.काल ज्या मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा झाल्या त्यात ही परंपरा कायम ठेवीत,प्रथम क्रमाक पटकाविला याचे सर्वच श्रेय आमच्या शिक्षक बंधूंचे आहे.विभागीय पातळीवर ही अमाचाच दबदबा राहणार आहे.या सर्व यशस्वी टीम अन् क्रीडा शिक्षकांचे अभिनंदन.-
तुकाराम भुसनर,
मुख्याध्यापक
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम