स्पर्श सेवाभावी संस्था संचलित आधार वृध्दाश्रमाला हटकर समाजाची अनोखी भेट
कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्थेकडून आदर्शयुक्त उपक्रम
आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे अवचित्य साधुन वडाचीवाडी ,ता.माढा येथिल श्री.सचिन कौले साहेब (समाज कल्याण अधिकारी) यांच्या स्पर्श सेवाभावी संस्था संचलित आधार या वृध्दाश्रमाला सकल हाटकर समाजाने भेट दिली व तेथे हाटकर समाज स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलन करून झाली समाजातील मात्तबर मंडळी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते
नंतर”कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्थे” मार्फत वृध्दाश्रमातील 25 सदस्यांना कपडे वाटप करण्यात आले समाजातील विविध घटकांनवर चर्चा झाली समाज संघटीत कसा करता येईल व संघटीत होण्याचे फायदे यावर प्रा.श्री.बाळासाहेब दबडे सर,डॉ.श्री.आप्पासाहेब भुसनर,प्रा.श्री.महादेव पाटील,डॉ.श्री.महादेव खोत,श्री.रविंद्र जिपटे,श्री.दत्तात्रय भुसनर,श्री. हेमंत पाटील ,ह.भ.प.आण्णा भुसनर महाराज,श्री. प्रा. सुभाष पाटील,श्री.विजय मरगर अशा अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
तर सुत्रसंचालनाची जबाबदारी श्री धनंजय कवले यांनी पार पाडली नंतर कर्तव्य सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील ,उपाध्यक्ष महादेव पाटील,संघटक दत्तात्रय भुसनर,खजिनदार बाळासाहेब दबडे,संपर्क प्रमुख रविंद्र जिपटे या सर्वाचे सचिन कवले साहेब व समस्त कवले परिवार वडाचीवाडी यांनी विशेष आभार मानले नंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात श्री.सचिन कवले साहेब यांचे मोलाचे योगदान होते
More Stories
नवसारी कृषी विद्यापीठातील शेतकरी मेळाव्यात मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना खास सहभाग
आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन
पंढरपूर येथे गीरगाय, कुक्कूट व शेळीपालन उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम